Railtail Bharti 2023: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. रेलटेलमध्ये एकूण 81 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल) च्या एकूण 26 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना संबंधित कामाता 5 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) ची एकूण 27 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी उमेदवारांनी बीई/बीटेक/बीएससी (इंजिनीअरिंग) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/ कॉम्पुटर सायन्स/ IT इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन M.Sc. (इलेक्ट्रॉनिक्स) किंवा MCA असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव असावा.
डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) च्या 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी MBA (मार्केटिंग) पूर्ण केलेले असावे. यासोबतच पदाचा 2 वर्षांचा अनुभव असावा. असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) ची 6 पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांनी MBA (फायनान्स) चे शिक्षण पूर्ण केलेले असावे. असिस्टंट मॅनेजर (HR) च्या 7 रिक्त जागा भरल्या जाणार असून उमेदवारांनी MBA (HR)चे शिक्षण पूर्ण केलेले असावे. या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 11 नोव्हेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षापर्यंत असावे. एससी/एसी उमेदवारांना यातून 5 वर्षांची तर ओबीसींना 3 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे. तसेच जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून 1200 रुपये अर्ज शुल्क तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून 600 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे.
उमेदवारांना त्यांच्या पदानुसार 60 हजार ते 1 लाख 40 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरी मिळू शकते. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले असून 11 नोव्हेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.