Fluffy White Rice Recipe in Marath: भात करताना अनेकदा त्यामध्ये कधी पाणी जास्त झाल्याने चिकट होतो. तर भाताचा कधी गोळा होतो. असा भात वरण-आमटीसोबत ही खायला कंटाळा येतो. तर कधी भात मोकळा व्हावा असं वाटत असताना तो खूपच फडफडीत होतो पण नीट शिजत नाही. अशावेळी असा भात घशाखालीही उतरत नाही. म्हणूनच भात नीट करता येणे हे देखील स्वयंपाकातले एकप्रकारचे कौशल्य मानले जाते. जर तुम्हाला भात नीट मोकळा करायचा असेल तर या टीप्स फॉलो करा...
भात नीट होण्यासाठी त्यामधील पाण्याचे प्रमाण ही तितकंच महत्त्वाचे आहे. अनेकजणी भात बनवताना तांदळात पाणी मोजून मापून टाकत नाही आणि मग भात कच्चा किंवा चिकट होतो. भात जर भांड्यात मोकळा शिजवणार असाल तर एका वाटीला दोन वाट्या पाणी असे प्रमाण घ्यावे. आणि भात जर कुकरला लावणार असाल तर एका वाटीला दीड पाणी असे प्रमाण घ्यावे. या प्रमाणात भात भांड्यात नाहीतर कुकरमध्ये करा तो छान मोकळाच होतो.
भात करताना मीठासोबतच थोडा लिंबाचा रसही टाकावा. भात जर भांड्यात शिजवत असाल तर पाण्याला उकळी आल्यावर त्यात लिंबाचा रस घालून मग झाकण ठेवावा आणि कुकरमध्ये शिजवत असाल तर एक शिट्टी झाल्यावर गॅस पाच मिनिटे मंद आचेवर ठेवावा. लिंबाचा रस टाकल्याने भात छान पांढरा दिसतो आणि मोकळा शिजतो.
भात करताना तांदूळ धुतांना घाई करू नये. तांदूळ चांगले चार पाच वेळा पाण्याने धुवावेत. त्यामुळे तांदळातले तण निघून जाते. त्यामुळे भात मोकळा होतो. तसेच भात करताना एक चमचा तूप किंवा बटर घालवं. त्यामुळे भात छान मोकळा शिजतो आणि भाताला स्वादही छान येतो.
भात बनवताना भांडे चांगले झाकून ठेवा आणि पाणी उकळायला लागल्यावर झाकण काढून भात शिजवा. मध्ये मध्ये भात तपासत राहा नाहीतर तांदूळ भिजण्याची शक्यता आहे.
तांदूळ धुतल्यानंतर ते एका मोठ्या भांड्यात तासभर भिजत ठेवावेत. आयुर्वेदात असे मानले जाते की तांदूळ, डाळी, काहीही बनवण्यापूर्वी पाण्यात भिजवल्यास त्यातील पोषक घटकांची संख्या वाढते.