मुंबई : लडाखमध्ये चीनशी झालेल्या गंभीर संघर्षानंतर गेल्या 5 महिन्यांत भारताने आपली सैन्य क्षमता वाढवली आहे. भारत रोज आपलं सैन्य मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने गेल्या दोन दिवसांत नौदलाच्या दोन विध्वंसक शस्त्रांची चाचणी केली.
चीनच्या विस्तारवादी धोरणाला उत्तर देण्यासाठी भारताने अरबी समुद्रात जहाजविरोधी क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली. या चाचणीची छायाचित्रे पाहून शत्रूची देखील झोप उडाली असेल. आयएनएस शत्रूवर हल्ला करण्यास सदैव तत्पर असते. याची झलक शत्रू देशांना भारताने दाखवली आहे.
भारताने आयएनएसच्या या अँटी शिप क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र विजेच्या वेगाने शत्रूच्या जहाजावर प्रहार करते. शत्रूला या हल्ल्याची माहिती मिळण्याआधीच हे क्षेपणास्त्र विनाश करतो.
ज्या INS प्रबळवर अँटी शिप मिसाईलचं परीक्षण करण्यात आलं. त्याला भारतीय नौदलाचा बाहुबली म्हटलं जातं. हे जहाज 11 एप्रिल 2002 मध्ये भारतीय नौदलात आलं होतं. 60 किमी प्रतितासाच्या गतीने ते समुद्रात चालतं. कोस्टल भागाची सुरक्षा आणि युद्ध दोन्हीसाठी हे काम करेल. ही युद्धनौका अनेक हत्यारं आणि मिसाईलने परिपूर्ण आहे.
आयएनएस प्रबळवर 16 केएच -35 अँटी शिप क्षेपणास्त्रे तैनात आहेत. रशियाची केएच -35 क्षेपणास्त्र एक अत्यंत प्राणघातक क्षेपणास्त्र मानली जाते. के-35 एक सबसॉनिक अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्रांची श्रेणी 130 किमी पर्यंत आहे.