विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून गावकऱ्यांचे आदिवासी महिलेसोबत गैरवर्तन

मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

Updated: Apr 14, 2019, 01:46 PM IST
विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून गावकऱ्यांचे आदिवासी महिलेसोबत गैरवर्तन title=

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. गावातील एका आदिवासी महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी तिला विचित्र शिक्षा दिलीय. आपण पाहत असलेल्या दृष्यांमध्ये पीडित महिलेनं तिच्या पतीला खांद्यावर घेतलंय. आणि यावेळी ग्रामस्थ पीडितेसोबत गैरवर्तन करत आहेत.

लग्न झाल्यानंतर दुसऱ्या पुरूषासोबत संबंध असल्याचा संशय गावकऱ्यांना आला. पतीला सोडून दुसऱ्या सोबत दिसलेल्या महिलेचा गावकऱ्यांना राग आला. त्यामुळे गावकऱ्यांनी विक्षिप्त शिक्षा सुनावली. पीडित महिलेला या नराधमांनी गावभर फिरवल्याचे समोर आले आहे.

 याच लोकांपैकी एकाने या संपूर्ण प्रकाराचे मोबाईल कॅमेरॅतून चित्रिकरण केले आहे. समाजमाध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस प्रशासनाला जाग आली आणि घडल्या प्रकाराचा शोध घेत कारवाई केली. या ठिकाणी महिले सोबत गैरकृत्य करण्यात आले असून व्हिडीओत दिसलेल्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आली आहे. समाज माध्यमांवरून या संतापजनक व्हिडिओवर कडाडून टीका करण्यात येत असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.