Corona New Variant : जगात कोरोनाचा (corona) कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. दरम्यान गेली दोन वर्षे कोरोनामुळे सणासुदीचा काळ घरातच गेला. गणेशोत्सवानंतर यंदाची दिवाळीही धूमधडाक्यात करण्याची तयारी सुरू झाली आहे. अशातच देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. तसेच वाढत्या केसेस पाहता मुंबई-केरळमध्ये अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. तज्ञांकडून सांगण्यात आले आहे की, कोविड -19 चे रुग्ण कोणत्या ही क्षणी वाढू शकतात.
ओमायक्रोनचा सब व्हेरिएंट ‘एक्सबीबी’ने हिंदुस्थानात आधीच शिरकाव केला आहे. केरळसह देशातील काही राज्यांत या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रातही नव्याने आढळणाऱया रुग्णांमध्ये या व्हेरिएंटची लक्षणे दिसून येत आहेत.
गेल्या तीन दिवसांत मुंबईत (mumbai corona case) कोविडच्या 150 हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचदरम्यान गेल्या पाच दिवसांत दररोज सरासरी 10 जणांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. शुक्रवारी राज्यात 477 नवीन रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 178 मुंबईत आहेत.
कोविडच्या नवीन XBB सब-व्हेरियंटचा एक रुग्ण महाराष्ट्रात (maharashtra corona cases) आढळून आला आहे. परिणामी तज्ञ सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत. दिवाळीच्या आधी आणि नंतर सण साजरे करताना बाजारपेठेत गर्दी वाढल्याने कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात अशी भिती आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
यादरम्यान काळजी घ्या!
मुंबईच्या आरोग्य अधिकार्यांचे मत आहे की, हिवाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतील इन्फ्लूएंझा सारख्या आजारांच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत कारण हा एक संसर्गजन्य रोग आहे जो शिंकण्याद्वारे इतर लोकांमध्ये पसरू शकतो.
वाचा : axis bank च्या खातेदारकांना धक्का; नियम बदल्यामुळे तुमच्यावर होणार असा परिणाम
काही लोकांना कोरोनाची लागण झालेली असू शकते आणि ते सामान्य सर्दी-खोकला समजून कोविड चाचणी करत नाहीत आणि तोपर्यंत ते हा विषाणू इतरांनाही संक्रमित करू शकतात. तज्ज्ञांनी कोविड-19 पासून दूर राहण्यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
आरोग्य विभागाने काय सांगितले?
- ठाणे, रायगड, मुंबई या भागांमध्ये कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
- 3 ते 6 ऑक्टोबर या आठवडय़ाच्या तुलनेत 10 ते 16 ऑक्टोबर या आठवडय़ात रुग्णसंख्येत 17.7 टक्के वाढ दिसून आली.
- पुण्यातील रुग्णाच्या नमुन्यांत सोमवारी ओमायक्रोन बीक्यू.1 या व्हेरिएंटची लक्षणे आढळली. हा या व्हेरिएंटचा देशातील पहिला रुग्ण ठरला.
- सणासुदीचे दिवस आहेत. त्यात थंडीचा मोसमही जवळ येत आहे. या कालावधीत कोविड रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे.
- तापाची लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.