मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रूग्णांच्या घट होताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेच अनेकांनी आपले प्राण गमावले. देशात दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही. गेल्या 24 तासांत देशात 58 हजार 419 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 87 हजार 619 रूग्णांना डिसचार्ज मिळाला असून 1 हजार 576 रूग्णांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.
India reports 58,419 new #COVID19 cases (less than 60,000 after 81 days), 87,619 discharges & 1576 deaths in last 24 hrs as per Health Ministry
Total cases: 2,98,81,965
Total discharges: 2,87,66,009
Death toll: 3,86,713
Active cases: 7,29,243Vaccination: 27,66,93,572 pic.twitter.com/MGYvftewvj
— ANI (@ANI) June 20, 2021
देशात एकून कोरोना रूग्णांची संख्या 2,98,81,965 इतकी आहे. तर आतापर्यंत 3,86,713 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 7,29,243 इतकी आहे. भारतात आतापर्यंत 27,66,93,572 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.