नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सीआईएसएफच्या ५० व्या स्थापना दिवसा निमित्त आयोजीत एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्यासाठी ते गाझीयाबाद येथील इंदारापुरम मधील सीआईएसएफच्या ५व्या बटालियन कॅम्पमध्ये पोहोचले. यावेळस पंतप्रधानांनी सीआईएसएफच्या जवानांनाही सन्मानित केले. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदिंनी पुलवामामध्ये झालेल्या
दहशतवादी हल्ल्यात ४० भारतीय वीर जवानांनी आपल्या प्रणाची आहुती दिली. या भारतपूत्रांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमन केले.
यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीआईएसएफच्या जवानांना संबोधित केले. पंतप्रधानांनी पाकिस्तानवर थेट निशाना साधला. पाकिस्तानमध्ये युद्ध करण्याची क्षमता नाही. पाकिस्तान नेहमिच दहशतवाद्यांना आसरा देतो. जेव्हा दहशतवादाचे वेग-वेगळे रूप समोर योतात तेव्हा देशाची सुरक्षा हे एक मोठे आव्हान समोर असते. याठिकाणी मी एक अशी ऊर्जा अनुभवत आहे, जी देशाच्या संरक्षणासाठी फार गरजेचे आहे.
कार्यक्रमस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी वायुसेनेच्या विमानाने पोहोचले. त्यानंतर त्यांनी परिसरातील शहीद स्मारकाला पुष्पहार अर्पण केले. पंतप्रधान मोदींनी सीआईएसएफच्या ५० व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधत शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'आपण संस्थेच्या रूपात 50 वर्षे पूर्ण केले. हे एक प्रशंसनीय यश आहे. देशाच्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी सीआयएसएफशी संबंधित सर्व लोक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.'
पंतप्रधान मोदींच्या सांगण्यानूसार, सीआयएसएफमध्ये मुलींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यासाठी मी मुलींचे आणि त्यांच्या आई - वडीलांचे अभिनंदन करत आहे. मेट्रो आणि विमानतळावर सीआयएसएफ सुरक्षेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, संस्थेला संरक्षण देण्यासाठी 30 लाख लोक येतात, जेथे प्रत्येक चेहरा भिन्न असतो, प्रत्येकाचा व्यवहार वेगळा असतो. हे काम एका व्हीआयपीला संरक्षण करण्यापेक्षाही मोठे कार्य आहे.