Petrol and Diesel Price Today: सध्या महागाईनं जोर धरला आहे त्यामुळे इंधनाचे दरही (Petrol Diesel Price Today) वाढताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही इंधनाचे दर हे वाढत आहेत त्यामुळे त्याचा परिणामही सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतो आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price Unchanged) दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून स्थिरता दिसते आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा आहे. अद्याप काही दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाली नसल्याचेही दिसून आले आहे.
1 एप्रिल ते 15 एप्रिल म्हणजे या महिन्याच्या सुरूवातीपासून ते आजच्या तारखेपर्यंतचा आढावा घेतला तर या किमतींमध्ये बदल नाही. त्यामुळे आज शनिवारी तुम्ही कुठे लॉन्ग विकेंडचा प्लॅन करणार असाल तर तुम्हाला पेट्रोल डिझेलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार नाहीत. (petrol and diesel price today check the fuel price 15th april 2023)
पेट्रोलची आजची किंमत ही 106.31 रूपये प्रति लिटर इतकी आहे. गुडरिटर्न्सनुसार, गेल्या 1 एप्रिलपासून पेट्रोलच्या किंमतींमध्ये अजिबातच वाढ झालेली नाही. त्यामुळे सध्या यामुळे ग्राहकांना चांगलाच दिलासा मिळलेला आहे. या वेबसाईटनुसार, जूलै 2022 पासून पेट्रोल किंमतीमध्ये समाधानकारक स्थिती आहे. आज डिझेलची किंमत ही 94.27 रूपये प्रति लिटर इतकी आहे. 5 एप्रिलपासून ते आत्तापर्यंत म्हणजे 15 एप्रिलपर्यंत म्हणजे गेल्या 10 दिवसात ही किंमत वाढलेली नाही.
मागच्या वर्षी रशिया आणि यु्क्रेनच्या युद्धामुळे इंधनदरवाढीवर मोठा (Fuel Price) परिणाम झालेला पाहायला मिळाला होता. त्यातून कच्च्या तेलाच्या किंमतींमध्येही लक्षणीय वाढ झाली होती. 2021 पासून खासकरून पेट्रोलची किंमत ही 100 रूपयांच्या पार गेली आहे. त्याअगोदर म्हणजे दुसऱ्या लॉकडाऊनच्या दरम्यान ही किंमत 96 रूपये प्रति लीटरच्या आसपास होती. मात्र गेल्या दोन वर्षात आणि मुख्यत्वे रशिया युक्रेनच्या पार्श्वभुमीवर (Crude Oil) ही किंमत प्रचंड वाढत गेली आणि आता ती मोठ्या चढ उतारानंतर 106 रूपये प्रति लीटरपर्यंत येऊन ठेपली आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पार्श्वभुमीवर ही किंमत 110 रूपयांच्याही वर पोहचली होती त्यामुळे ग्राहकांच्या नाकीनऊ आले होते. त्यानंतर मे 2022 पर्यंत या किंमतीत फारसे बदल झाले नाही. परंतु यादरम्यान आणखी 100 रूपयांनी पेट्रोलची किंमत ही वाढली होती आणि ही किंमत 120 च्या पार गेली होती. त्यानंतर आता महागाई, युद्ध आणि वातावरण बदल (Climate Change), कच्च्या तेल्याच्या किमती यांमध्ये बरेच बदल होत असतात पेट्रोलच्या किमतीत दोन वर्षात पाहिली त्याप्रमाणे गेल्या काही महिन्यात लक्षणीय वाढ झाली नाही.