Petrol-Diesel Price: महागाईची झळ सोसणाऱ्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर असून पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कोणतेही बदल केले नाहीयेत. भारतीय ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 21 जून 2023पर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी केले आहेत. ज्यात कोणताही बदल करण्यात आला आहे. देशातील तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करतात. देशातील चार महानगरांमध्ये सर्व शहरांमध्ये इंधनाचे दर जारी करण्यात आले आहेत. (Petrol-Diesel Price Today)
आज सलग 427वा दिवस असून पेट्रोल आणि डिझेलच्या भावात कोणताही बदल करण्यात आला नाहीये. म्हणजेच गेल्या 15 महिन्यापेक्षा अधिक कालावधीत इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. मुंबईत आज बुधवारी एक लीटर पेट्रोलचा भाव 106.31 रुपये इतका आहे. दिल्लीत 96.72 रुपये एक लीटर साठी मोजावे लागतात. कोलकात्यात 106.03 रुपये आणि चेन्नईत पेट्रोलचा भाव 102.63 रुपये झाला आहे.
मुंबईत आज एक लीटर डिझेलचा 94.27 रुपये इतका आहे. दिल्लीत डिझेल 89.62 रुपये आहे. चेन्नईत एक लीटर डिझेलचा भाव 94.24 रुपये इतका असून कोलकात्यात डिझेलचा भाव 92.76 रुपये इतका आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. WTI क्रूड प्रति बॅरल 74.94 डॉलरपर्यंत घसरले आहे आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 79.32 डॉलरच्या जवळ पोहोचले आहे.जुलै 2008 नंतर या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहोचल्या. यानंतरही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झालेली नाही. कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यानंतरही गेल्या 14 महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
राजस्थानच्या गंगानगर आणि हनुमानगढ जिल्ह्यात देशातील सर्वात महाग पेट्रोल विकलं जात आहे. गंगानगरमध्ये पेट्रोल 113.48 रुपये प्रतीलीटर आणि डिझेल 98.24 रुपये प्रती लिटर प्रमाणे विकले जाते. तर, हनुमानगढमध्ये एक लीटर पेट्रोलसाठी 112.54 रुपये मोजावे लागतात. तर डीझेलसाठी 97.39 रुपये मोजावे लागतात.
तर, पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जाते. पेट्रोलची किंमक प्रति लिटरसाठी 84.10 आणि डिझेलचा भाव 79.74 रुपये इतका आहे.