नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून आज जनतेशी संवाद साधला. भारतात कोरोनाविरोधाची लढाई जनता लढत आहे. शासन आपल्या सोबत आहे. आज पूर्ण देश, प्रत्येक नागरिक या लढाईचा शिपाई आहे. या लढाईचे नेतृत्व करत आहे. पूर्ण जग या कोरोनाशी लढतोय. भविष्यात कोरोनाविरोधातील लढाईचा वेध घेतला जाईल तेव्हा भारतातील नागरिकांच्या लढाईचा गौरव होईल असे ते म्हणाले.
कोरोनाविरोधात प्रत्येक घटकाचं योगदान आहे. शेतकरी अन्न पुरवत आहेत. कोणी भाडे माफ करत आहेत.
covidwarriors.gov.in या पोर्टलवर सव्वा कोटी जण जोडले गेले आहेत. डॉक्टर्स, परिचारिका, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक याच्याशी जोडले गेले आहेत. तुम्ही देखील याच्याशी जोडले जाऊन कोविड वॉरियर बना असे आवाहन त्यांनी केले.
या परिस्थितीत जनतेने जी संकल्पशक्ती दाखवली यामुळे नवे बदल देशात दिसत आहेत. देशवासियांच्या या लढ्याला पंतप्रधानांनी नम्र अभिवादन केले.
अत्यावश्यक सेवांचे देशात वहन होत आहे. यासाठी ३ लाखा किमीचे उड्डाण करण्यात आले.रेल्वेकडून लाखो किमी साहित्याचे वहन होत आहे.
गरिबांच्या अकाऊंटला थेट पैसे दिले जात आहेत. रेशन दिले जात आहे. सरकारचे कर्मचारी दिवसरात्र यासाठी काम करत आहेत.
राज्य सरकारांची भूमिका यामध्ये महत्वाची आहे. समाजाच्या दृष्टीकोनात व्यापक बदल झाला आहे. डॉक्टर, सफाई कर्मचारी, पोलीस व्यवस्थेबद्दल देखील समाजाच्या दृष्टीकोन बदलला आहे. पोलीस कर्मचारी समाजापर्यंत औषध, अन्न पोहोचवत आहेत. हा असा क्षण आहे, ज्यामध्ये जनता पोलिसांशी भावनिकरित्या जोडली गेली आहे.यामुळे सकारात्मक बदल येणार आहे.
भारताने स्वत:च्या गरजा पूर्ण करताना सोबतच जगातील देशांमध्ये औषधे पोहोचवली आहेत.