मुंबई : भारताचे शहीद जवान औरंगजेब यांचं पार्थिव आज त्यांच्या घरी आणण्यात येणार आहे. आज शहीद राईफलमॅनला निरोप देण्यात येईल. मात्र त्यापूर्वीच अपहरण केलेल्या दहशतवाद्यांनी शहीद औरंगजेब यांचा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय. यात झाडाखाली बसलेल्या शहीद जवानाला दहशतवाद्यांनी काही प्रश्न विचारले.. शहीद औरंगजेब यांनीही धाडसानं सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली.
दरम्यान शहीद औरंगजेब यांचे पार्थीव आज पूंछ इथं त्यांच्या रहात्या घरी आणण्यात येणार असून त्यांच्या पार्थीवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हे पण वाचा : शहीद जवान औरंगजेब यांचा मृत्युपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ आला समोर
Poonch: Family of Rifleman Aurangzeb mourns his death. He was abducted by terrorists and his body was found in Pulwama's Gusoo, yesterday. pic.twitter.com/F2xchFCB9A
— ANI (@ANI) June 15, 2018
दहशतवाद्यांनी औरंगजेब यांना एका झाडाखाली बसवलं आहे आणि त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करत आहेत. व्हिडिओत कुठल्याही दहशतवाद्याचा चेहरा दिसत नाहीये. मात्र, दहशतवाद्यांचा आवाज स्पष्ट ऐकायला येत आहे. या व्हिडिओत रायफलमॅन औरंगजेबला त्याच्या वडिलांचं नाव, घर, कुठल्या चकमकीत सहभागी होता असे अनेक प्रश्न दहशतवादी विचारत आहेत. तु मेजर शुक्लाच्या टीममध्ये सहभागी होतास का? असा प्रश्नही दहशतवादी विचारत आहेत. मेजर शुक्ला यांच्या टीमने दहशतवादी समीर टायगर याचा खात्मा केला होता.