Viral Story : गेल्या काही वर्षांपासून नागरीकांवर सोशल मीडियाचा (Social Media) प्रभाव खुप वाढला आहे. या सोशल मीडियामुळे लोक रातोरात स्टार बनत चालली आहेत. अनेकांना या माध्यमातून मदतीही मिळत आहेत. अशाच एका गरीब महिलेच्या (Poor Women) मदतीला आता सोशल मीडिया धावून आले आहे. आणि नेटकऱ्यांनी मिळून या महिलेसाठी 50 लाखाची मदत गोळा केली आहे. या मदतीमुळे आता महिलेची गरीबी सुधारणार असून आयुष्यात काहीसा बदल नक्कीच होणार आहे.
केरळमध्ये (Kerala) राहणाऱ्या एका 46 वर्षीय सुभद्रा यांच्या पतीचे निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस काढणे खुप अडचणीचे ठरत होते. कारण सुभद्रा यांना तीन मुले होती.या तीन मुलांचा सांभाळ करून घर खर्च चालवणे खुपच अवघड जात होते. त्यात सुभद्रा यांच्या हाती काम देखील नव्हते, घरात दररोज खाण्यासाठी अन्न देखील नव्हते. म्हणून त्या हतबल झाल्या होत्या.
सुभद्राने मुलांना शिकवणाऱ्या एका महिला (Teacher) शिक्षिकेकडून 500 रूपयांचे कर्ज मागितले होते.सुभद्राची वाईट परिस्थिती पाहुन शिक्षिकेने देखील तिला हजार रूपयांची मदत केली होती. मात्र शिक्षिकेला माहिती होते की, या हजार रूपयातून तिचे काहीच भागणार नाही. त्यामुळे शिक्षिकेने तिच्या मदतीसाठी एक क्लुप्ती लढवली होती.
शिक्षिकेने (Teacher) सुभद्राच्या घरी जाऊन पाहिले तर तिच्याकडे मुठभर धान्य उरले नव्हते.मुलांकडे खायला देखील काहीच नव्हते. त्यामुळे शिक्षिकेला कळून चुकलेले की तिच्या इतक्याश्या मदतीने काहिच होणार नाही आहे. त्यामुळे तिने सुभद्रासाठी क्राउडफडिंग मोहिम सुरु केली होती.
शिक्षिकेने (Teacher) फेसबूकवर सुभद्राबाबत एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने सुभद्राच्या गरीबीची माहिती दिली होती. या माहितीत तिने क्राउडफडिंगद्वारे मदत करण्याचे आवाहन करत सुभद्राच्या बँक खात्याचा नंबर लिहला होता.या आवाहनाला नेटकऱ्यांची खुप चांगली साथ मिळाली आणि 50 लाखहून अधिक रक्कम जमा झाली होती.
दरम्यान शिक्षिकेच्या (Teacher) फेसबूक पोस्टमुळे आणि नेटकऱ्यांच्या मदतीमुळे आता सुभद्राचे नशीब पालटले आहे.