Rajasthan Crime: घरातील मूलं किरकोळ आजारी असतील तर आईवडिल डॉक्टरकडे नेतात. पण डॉक्टरकडे गेल्यावर त्यांना भलतंच काही कळालं तर? हो अशी घटना प्रत्यक्षात घडली असून मुलींच्या वडिलांना जे कळालं ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. दोन्ही मुलींच्या पोटात दुखतंय म्हणून वडिल त्यांना घेऊन डॉक्टरकडे गेले पण दोघी प्रग्नेंट असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राजस्थानमधून हा प्रकार समोर आला.
पोटात दुखू लागल्याने दोन मुलींना डॉक्टरांकडे नेण्यात आले. दोघीही गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. मोठ्या मुलीचे वय १५ वर्षे असल्याचे सांगण्यात आले. ती साडेसात महिन्यांची गरोदर आहे, तर तिची धाकटी बहीण 12 वर्षांची आहे. ती अडीच महिन्यांची गरोदर आहे. दोघांचा तपास अहवाल वडिलांसमोर ठेवताच त्यांना धक्का बसला.
आपल्या जवळच्या लोकांनीच हे कृत्य केले आहे हे त्यांना समजले. राजस्थानमधील अलवरमधून दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर सतत बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कोणाला काही सांगू नकोस अन्यथा ठार मारण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना राजस्थानमधील अलवरची आहे. दोन अल्पवयीन मुलींवर अनेक महिने सामूहिक बलात्कार करून त्यांना धमकावले जात होते. यासंबंधी आता एनईबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलींचे कुटुंब जवळच्याच फार्म हाऊसमध्ये मजुरीचे काम करते आणि तेथे वीटभट्टीही असल्याचे सांगण्यात आले. येथे एक व्यक्ती आपल्या अल्पवयीन मुलींसोबत काम करतो. ते दुधाचा व्यापारही करतात आणि त्यांच्या दोन्ही मुली शेळ्या चरण्याचे काम करतात. एक मुलगी 15 वर्षांची तर दुसरी 12 वर्षांची आहे.
या फार्म हाऊसवर सप्पी आणि सुभान नावाचे दोन लोक काम करतात. सप्पी हा फार्म हाऊसवर शेतात काम करायचा आणि सुभान शेळ्या चरायचा. दोन्ही आरोपी गेल्या दीड वर्षांपासून मोठ्या मुलीवर बलात्कार करत होते. ती गरोदर राहिल्यानंतर त्याने चिमुरडीवरही बलात्कार केला. तीही गरोदर राहिली. कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने दोघांनाही दिली.
अखेर दोघांची तपासणी केली असता त्या गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मेडिकल करण्यात आल्याचे संबंधित स्टेशन प्रभारींनी सांगितले. सध्या आरोपींचा शोध सुरू आहे.
चौकशीनंतर मुलींनी संपूर्ण घटना सांगितली आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मुलीच्या वडिलांनी सांगितले. एवढेच नव्हे तर आरोपीने दोन लाख रुपयांचे लालूच दाखवून गुन्हा दाखल न करण्याची तयारी दर्शवली होती, त्यानंतर ते अचानक गायब झाले, असेही त्यांनी सांगितले.