नवी दिल्ली : रेशन कार्डधारकांसाठी (Ration Cardholder) अतिशय महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने (Central Government) रेशन कार्डधारकांसाठी नवे नियम (Ration Card Rules) जारी केले आहेत. जर तुम्हीही रेशनचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. केंद्र सरकारने नक्की नियम केलेत हे आपण जाणून घेऊयात. (ration card news central government changes rule for free rations)
सरकारकडून नाममात्र दरात आणि मोफत अन्नधान्य दिलं जातं. मात्र हे अन्नधान्य मिळवण्यासाठी सरकारच्या काही अटी शर्थीही असतात. मात्र जे या योजनेसाठी पात्र नसतात, असे अपात्र रेशन कार्डधारकही याचा गैरफायदा घेतात. या अशा अपात्रांना रोखण्यासाठी सरकारने नवे नियम केले आहेत. तसेच नियमांचं पालन न करणाऱ्यांचं रेशन कार्ड रद्द केलं जाईल, असा इशाराही केंद्र सरकारने दिला आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार, जे या योजनेसाठी पात्र आहेत, त्यांनी व्हेरिफिकेशन करुन घ्यावं. सरकारने व्हेरिफिकेशन करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तसेच जे अपात्र असतील, त्याचं रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. दरम्यान सरकारने आतापर्यंत अनेक अपात्र रेशन कार्डधारकांविरोधात कारवाई केली आहे. आतापर्यंत एकूण 2 कोटी 41 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक कार्ड हे यूपीमधील आहेत.