रेशन दुकानदारांनो सावधान, धान्य मोजताना फसवणूक केली तर भोगावी लागेल ही शिक्षा

कमी धान्य देत रेशन कार्डधारकांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारांना आता केंद्र सरकार चांगलीच अद्दल घडविणार आहे, 

Updated: May 17, 2022, 03:01 PM IST
रेशन दुकानदारांनो सावधान, धान्य मोजताना फसवणूक केली तर भोगावी लागेल ही शिक्षा title=
नवी दिल्ली : रेशन कार्डच्या (Ration Card ) माध्यमातून देशातील गरजूंना स्वस्त धान्य रेशन दुकानांमधून देण्यात येत. मात्र हे धान्य देताना अनेक शिधावाटप दुकानदार कमी धान्य देत कार्डधारकांची फसवणूक करत आहेत, यावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
 
अनेक शिधावाटप दुकानदार रेशनचे धान्य कमी देऊन कार्डधारकांची फसवणूक करत असल्याची बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आली आहे. यासाठी केंद्र सरकारने कार्डधारकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी नवा नियम केला आहे.
 
रेशन दुकानात होणार हा गैरप्रकार रोखण्यासाठी आता रेशन दुकानांवर इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल ( EPOS ) उपकरण बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कार्डधारकांना योग्य प्रमाणात धन्य मिळावे यासाठी EPOS उपकरण इलेक्ट्रॉनिक स्केलसह जोडणे बंधनकारक केले आहे. 
 
रेशन कार्डधारकांना योग्य प्रमाणात धान्य मिळावे, त्यांची होणारी फसवणूक थांबविण्यासाटी सरकारने हा नियम घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA ) केंद्र सरकारतर्फे देशातील 80 कोटी लोकांना अनुक्रमे 2 रुपये दराने प्रति व्यक्ती 5 किलो गहू आणि तांदूळ देण्यात येत आहेत. 
 
रेशनकार्ड धारकाला कमी धान्य मिळत असेल तर याबाबत त्याला आता तक्रारही करता येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक राज्यासाठी एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. यावर कमी धान्य देणाऱ्या शिधावाटप दुकानदाराची तक्रार करता येईल.
 
धान्य कमी मिळत असेल तर तक्रार करण्यासाठी राज्याचा टोल फ्री नंबर https://nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AA या लिंकवर क्लिक करून आपण  मिळवू शकतात. अनेक महिने आपणास रेशनकार्ड मिळणे नसेल तर याबबाबतही इथे तक्रार करण्याची मुभा आहे. महाराष्ट्रासाठी 1800-22-4950 हा टोल फ्री हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे.