नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तीन बँकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. नियम मोडल्यानं ही कारवाई करण्यात आली. वारंवार सांगूनही नियम मोडल्यानं अखेर RBI ला कठोर निर्णय घ्यावा लागला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वेळोवेळी बँकांकडून नियमांचे पालन न केल्याबद्दल बँकांवर दंड आकारला जातो.
आता रिझर्व्ह बँकेने 'द नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँके'सह तीन सहकारी बँकांवर नियमांचं पालन न केल्यानं दंड ठोठावला आहे. याबाबत RBI कडून एक निवेदन देण्यात आलं आहे.
मुंबईस्थित 'महाराष्ट्र राज्य सहकारी बँके'ने फसवणूक अहवाल आणि देखरेख संदर्भात जारी केलेल्या राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) निर्देशांचे पालन न केल्याबद्दल बँकेला 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यानं 50 लाखांचा दंड
मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की 'द नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँके'ला इतर बँकांमधील डिपॉझिट प्लानिंग आणि डिपॉझिट रक्कम यावरच्या व्याजासाठी लावण्यात आलेल्या नियमांचं पालन न केल्यानं 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
बिहारमधील बेतिया येथे असलेल्या 'नॅशनल सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड'लाही 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोटक महिंद्रा आणि Indusind Bank बँकेवर एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. Indusind Bank बँकेवर KYC च्या नियमांचं पालन न केल्यानं दंड ठोठावण्यात आला.