Bihar Girl : सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक मुलगी एका पायावर शाळेला जात आहे. ही मुलगी अपंग आहे.
ग्रामीण भागातला हा व्हिडीओ आहे. अपंग असल्यामुळे एखादी व्हिलचेअर असावी अशी अपेक्षा होती मात्र या मुलीकडे असं कोणतही साधन नाही. एका पायात साधी चप्पल देखील नाही किंवा हातात कुबड्या सुद्धा नाहीत. या परिस्थिती सुद्धा ती रोज शाळेत जाते. या मुलीचं नाव सीमा आहे. हिचं वय अवघं 10 वर्षे आहे. या मुलीचा शाळेत जातानाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अभिनेता सोनू सूद ( Sonu Sood) याने मदतीचा हात पुढे केला आहे.
आपण अनेकदा पाहिले आहे की, अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) नेहमीच गरजवंतांच्या मदतीला उभा राहिला आहे.कोरोनाच्या प्रसंगी त्याने अनेकांना मदत देखील केली आहे. सीमाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोनू सूद याने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये सोनू सूद (Sonu Sood) म्हणतो. "आता एका नाही तर दोन्ही पायांवर शाळेत जायचं आहे. मी तुम्हाला तिकीट पाठवतोय. वेळ आली आहे दोन्ही पायांवर चालण्याची" या ट्विटचा अर्थ स्पष्ट आहे की, सोनू सूद या मुलीच्या मदतीसाठी उभा राहिला आहे.
या मुलीचं नाव आहे सीमा (Seema). एका दुर्घटनेत ( Road Accident) सीमाने आपला एक पाय गमावला (lost leg) होता. सीमाचं घर आणि शाळा यातील अंतर आहे 1 किलोमीटर. सीमा रोज शाळेत एका पायावर जाते. बिहारच्या जमुई जिल्ह्यातील ग्रामीण भागात सीमा रहाते. तिच्या एका पायात चप्पल सुद्धा नाही. तापलेल्या जमिनीवर एका पायाने चालत ती आपल्या भविष्याचा मार्ग सुकर करत आहे. सीमा रोज शाळेत जाते. तिचं शिक्षिका होण्याचं स्वप्न आहे.
अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी सुद्धा आपल्या ट्विटर वर सीमाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. केजरीवाल यांनी एक भावूक पोस्ट देखील लिहली आहे (Arvind Kejriwal tweet) . मुख्यमंत्री केजरीवाल म्हणतात. ''10 वर्षाच्या सीमाने मला भावूक केलं. देशातील प्रत्येक मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. मला राजकारण समजत नाही. फक्त इतकं माहित आहे की, सरकारकडे खूप साधनं आहेत. सीमा सारख्या प्रत्येक मुलाला चांगल्यातलं चांगलं शिक्षण देणं हेच मिशन एका सच्चा देशभक्ताचं असू शकतं''