सणासुदीच्या हंगामात सोन्याचे दर स्थिर, चांदी झाली स्वस्त

दिल्लीच्या सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या दरात १०० रुपयांची घट होत ते प्रतिकिलो ४१,४०० रुपयांवर पोहोचले. चांदीच्या दरात घसरण झाली असली तरी मात्र सोन्याचे दर स्थिर राहिले. 

Updated: Oct 16, 2017, 06:56 PM IST
सणासुदीच्या हंगामात सोन्याचे दर स्थिर, चांदी झाली स्वस्त

नवी दिल्ली : दिल्लीच्या सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या दरात १०० रुपयांची घट होत ते प्रतिकिलो ४१,४०० रुपयांवर पोहोचले. चांदीच्या दरात घसरण झाली असली तरी मात्र सोन्याचे दर स्थिर राहिले. 

राजधानी दिल्लीत चांदीचे दर १०० रुपयांनी कमी होत प्रति किलो ४१,४००वर पोहोचले. दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रति तोळा ३०,८५० आणि ३०,७०० रुपयांवर बंद झाले. 

याआधी शनिवारच्या सत्रात सोन्याच्या दरात ५० रुपयांची घसरण झाली होती.