ज्या बापाने जग दाखवलं, त्याच्याच जीवावर उठला, चक्क 'या' कारणासाठी दिली जन्मदात्याच्या हत्येची सुपारी

बाप लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ज्या बापाने पोराला जग दाखवलं त्याच बापाचा पोटच्या पोराने काटा काढला आहे. पोराने आपल्याच बापाची सुपारी दिली आणि बापाला संपवलं. या घटनेने संपुर्ण गावात खळबळ माजली असून पोटच्या मुलानेच बापाच्या हत्येची सुपारी दिल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. पंजाबमधील सलेपमुर गावामधून हे प्रकरण समोर आलं आहे.

Updated: Aug 3, 2022, 05:17 PM IST
ज्या बापाने जग दाखवलं, त्याच्याच जीवावर उठला, चक्क 'या' कारणासाठी दिली जन्मदात्याच्या हत्येची सुपारी title=

Crime News : बाप लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ज्या बापाने पोराला जग दाखवलं त्याच बापाचा पोटच्या पोराने काटा काढला आहे. पोराने आपल्याच बापाची सुपारी दिली आणि बापाला संपवलं. या घटनेने संपुर्ण गावात खळबळ माजली असून पोटच्या मुलानेच बापाच्या हत्येची सुपारी दिल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. पंजाबमधील सलेपमुर गावामधून हे प्रकरण समोर आलं आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

मनजीत सिंग यांची सलेमपुर गावात आठ एकर जमीन आहे. रविंदर सिंह हा त्यांचा एकुलता एक मुलगा. पण वडिल जमीन कोणाला तर विकतील अशी रविंदर सिंह याला भीती वाटत होती. यातूनच त्याने वडिलांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने अर्शप्रीत सिंह आणि करतार सिंह या दोघांना वडिलांच्या हत्येची सुपारी दिली. यात त्याने 1 लाख रुपये अॅडव्हान्सही दिले. तर हत्या केल्यानंतर 2 लाख रुपये देण्याचं ठरलं.

रविंदर सिंहने असा रचला प्लान

रविंदर सिंहने वडिलांच्या हत्येसाठी अतिशय सुनियोजित कट रचला. आपले मित्र असल्याचं भासवत रविंदर सिहंने गुंड अर्शप्रीत सिंह आणि करतार सिंह यांची आपल्या वडिलांशी ओळख करुन दिली. यानंतर घरातच त्यांनी पार्टी केली. आरोपींनी मनजीत सिंह यांना आधी भरपूर दारू पाजली आणि त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली.

दारुच्या नशेत असल्याने मनजीत सिंह यांना आरोपींचा मुकाबला करता आला नाही. याचाच फायदा उचलत आरोपींनी मनजीत सिंह यांना गाडीत बसवून घरापासून दूर नेलं आणि तिथे त्यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मनजीत सिंह यांचा मृतदेह जवळच्या शेतात फेकून दिला.

48 तासात पोलिसांनी लावला खूनाचा छडा

दरम्यान, गावातल्या एका शेतात बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचत पोलिसांनी माहिती घेतली असता हा मृतदेह सलेमपुर गावात राहणाऱ्या मनजीत सिंह यांचा असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी त्यांचा मुलगा रविंदर सिंह याच्याकडे चौकशी केली असता त्याची वागणूक संशयास्पद आढळली.

संशयावरुन पोलिसांनी रविंदर सिंह याच्याकडे कसून चौकशी केली. अखेर रविंदर सिंहने आपणच वडिलांच्या हत्येची सुपारी दिल्याचं कबुल केलं. पोलिसांनी तात्काळ रविंदर सिंह याला अटक केली, अर्शप्रीत सिंह आणि करतार सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे. 

Tags: