मुंबई : आजच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून खरेदीसाठी जाणं फार कठीण असतं. त्यामुळे अनेक शॉपिंग वेबसाइट देखील उपलब्ध आहेत. परंतु काही वेळेस खोट्या वस्तू निश्चित स्थळी पोहोचवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. असे प्रकार सर्रास उघडकीस येतात. आता ही समस्येचा अंत कदाचीत पुढील वर्षी होवू शकतो. कारण २०२० मध्ये 'डिजिटल मॉल ऑफ आशिया' नावाने देशात पहिला डिजिटल मॉल उभा राहणार आहे.
या डिजिटल मॉलमध्ये तुम्हाला संगणक, लॅपटॉप, मोबाईलच्या माध्यमातून अखंड मॉलमध्ये फिरून तुम्हाला खरेदी करता येणार आहे. डिजिटल मॉल एखाद्या साध्या मॉल प्रमाणे असणार आहे. ग्राहक एखाद्या कंपनीच्या आउटलेटच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी करू शकतो.
जर वस्तू आवडल्यास ती वस्तू तुम्ही ट्राय देखील करू शकता. फक्त त्याची पद्धत काहीप्रमाणात वेगळी असू शकते. शिवाय या मॉलमध्ये तुम्ही दुकान देखील विकत घेवू शकता. त्यासाठी ब्रांडेड कंपन्या आणि विक्रेत्यांकडून मासिक कर आकारला जाणार आहे.
डिजिटल मॉल भारतात दिल्ली-एनसीआरमध्ये सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे लखनऊ, भुवनेश्वर, मंगलोर, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, पुणे, चंदीगड, जयपूर, मैसूर, कोयंबटूर, अहमदाबाद, देहरादून आणि लुधियाना येथे डिजिटल मॉल्स सुरू करण्याची योजना आहे.
भारत देशा शिवाय डिजिटल मॉल चीन, जापान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, मलेशिया, थायलँड, इंडोनेशियामध्ये देखील सुरू होणार आहे.