फ्रिजच्या दरवाजात अडकवा पेपर, वीज बिल येईल अर्ध्यापेक्षा कमी

Electricity Bill : वाढत्या वीज बिलामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. अशातच घराचे वीज बिल कमी करण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

Updated: Jun 3, 2023, 01:00 PM IST
फ्रिजच्या दरवाजात अडकवा पेपर, वीज बिल येईल अर्ध्यापेक्षा कमी title=
Tips To Reduce Electricity Bill

Tips To Reduce Electricity Bill In Mararthi  : उन्हाळा असो किंवा हिवाळा विजेचा सर्वाधिक वापर होत असतो. यामुळे वीज बिल ( Electricity Bill) जास्त येण्याच्या भीतीने लोक विजेचा वापर कमी करु लागतात. मात्र उन्हाळ्यात कितीही वीज बचतीचा प्रयत्न केला तरीही हजारच्या घरात वीजबिल येते. तसेच उन्हाळा म्हटलं की घरातील प्रत्येक व्यक्तीला फ्रिजमधून पाण्याची बाटली बाहेर काढण्यासाठी दिवसातून अनेक वेळा फ्रीज उघडावा लागतो. फ्रिज वारंवार उघडल्याने फ्रीजच्या अंतर्गत तापमानात फरक पडतो आणि फ्रीजची वीजही जास्त लागते.त्यामुळे वीज बिल जास्त येते, असे म्हणतात. पण आता फ्रीजमुळे लाईट बिल वाढन्याचं टेन्शन येणार नाही. कसं ते जाणून घ्या... 

फ्रीजमुळे तुमचे वीजबिल जास्त येत असेल तर अशावेळ फ्रीजच्या दरवाजात फक्त एक साधा पेपर अडका. यामुळे तुमचे वीज बिल कमी येईल असा दावा काही गृहिणींनी केला आहे. वीजबिल कमी करण्याचा सोपा फंडा काही गृहिणींनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. युट्युब अकाऊंटवर याचे व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. एक पेपर वीजबिलची बचत कसं कमी करेल... असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना...

वीजबिल कमी यावं असं वाटतं असेल तर, फ्रीजच्या दरवाजाच्या मध्यभागी एक कागद धरायचा आहे. अशावेळी तुम्ही साधा कागद किंवा टिश्यू पेपरचा ही वापर करु शकता. कागदाचा थोडासा भाग फ्रीजबाहेर राहिल अशापद्धतीने दरवाजा बंद करा. यानंतर फ्रीजच्या दरावाजात अडकलेला कागद हलक्या हाताने खेचण्याचा प्रयत्न करा. जर कागद सहज आणि पटकन बाहेर आला तर फ्रीजच्या रबरमध्ये समस्या आहे समजून जा... 

जर फ्रीजचा रबर खराब असेल तर एका बारीक काठीत कापूस टाकून त्याने रबरातील घाण साफ करुन घ्या. रबरमध्ये घाण असल्यामुळे ते चिकट होते आणि लवचिकता नसते. त्यामुळे फ्रीजचा दरवाजा नीट लागत नाही. आणि एक उपाय म्हणजे हेअर ड्रायर किंवा रबरला गमन हवा मिळेल असं काहीतरी घेऊन रबरला गरम हवा द्या. यामुळे रबर फुलतील ते नीट होतील. 

हे सर्व केल्यानंतर पुन्हा दरवाजात पेपर अडकवून ते खेचून पाहा. जर पेपर बाहेर आला तर केलेला उपाय आणखी एकदा करा. कागद बाहेर आला नाहीतर समजा तुमचा दरवाजा घट्ट लागला आहे. आता दरवाजा घट्ट असल्याने फ्रिजमधील थंड हवा बाहेर येणार नाही आणि फ्रिजला थंड राहण्यासाठी फार विजेची गरड पडणापर नाही..असे केल्याने तुमचे लाइट बिल कमी होण्यास मदत होईल.