Petrol Diesel Prices : पेट्रोल- डिझेलच्या दरात बदल; पाहा तुमच्या शहरात किती पैसे मोजावे लागणार

Petrol Diesel Prices : वाहनधारकांनो ही बातमी तुमच्यासाठी. खिशात जरा जास्तीचेच पैसे ठेवा कारण पेट्रोल डिझेलचे दर बदलले आहेत. कुठं बाहेर जाणार असाल तर तिथले दरही आताच पाहून घ्या.   

Updated: Mar 24, 2023, 07:57 AM IST
Petrol Diesel Prices : पेट्रोल- डिझेलच्या दरात बदल; पाहा तुमच्या शहरात किती पैसे मोजावे लागणार title=
todays Petrol Diesel price latest Marathi news

Petrol Diesel Prices : जागतिक आर्थिक मंदीची चाहूल, चलनामध्ये होणारे चढ उतार आणि कच्च्या तेलाच्या किमती या साऱ्याचे थेट परिणाम नागरिकांच्या आर्थिक गणितांवर होताना दिसत आहेत. गेल्या काही काळापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं होणारी वाढ आणि किरकोळ घट पाहता वाहनं चालवायची की नाही हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. (todays Petrol Diesel price latest Marathi news)

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वरखाली होत असतानाच शुक्रवारी सकाळी सरकारी तेल विक्रेत्या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. ज्यावरून अनेक राज्यांमध्ये हे दर बदलल्याचं लक्षात आलं. असं असलं तरीही कोलकाता, चेन्नई आणि देशातील इतरही काही प्रमुख शहरांमध्ये मात्र दरांमध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. 

मागील 24 तासांमध्ये कच्च्या तेलाच्या दरात काही बदल झाले आहेत. जिथं, ब्रेंट क्रूडचे दर 75.46 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. तर, डब्‍ल्‍यूटीआईचे दर 69.45 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. 

देशातील प्रमुख शहरांमध्ये इंधनाचे दर... 

कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये , डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर
चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये , डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर
मुंबई - पेट्रोल 106.31 रुपये,  डिझेल 94.27 रुपये प्रति लीटर
दिल्ली - पेट्रोल 96.65 रुपये , डिझेल 89.82 रुपये प्रति लीटर

महाराष्ट्रातील पेट्रेलच्या दरांवर एक नजर 

अहमदनगर- 106.40 रुपये 
बीड- 107.96 रुपये 
चंद्रपूर- 106.12 रुपये 
धुळे - 106.13 रुपये 
गडचिरोली - 107.26 रुपये 

Maharashtra weather : राज्यातील 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; पाहा कुठे दिसणार अवकाळीचे परिणाम 

 

कोल्हापूर - 107.45 रुपये 
नाशिक- 106.51
पुणे - 106.61 रुपये 
सातारा - 106.76 रुपये 
ठाणे - 106.76 रुपये 

कसे ठरतात इंधनाचे दर? 

दर दिवशी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल होऊन नवे दर लागू होतात. यामध्ये एक्साईज ड्यूटी, डिलर कमिशन, वॅट आणि इतर काही गोष्टी जोडून अंतिम दर निश्चिती होते.