Viral Video Of Snake: अजगर (Python family Snake) हा एक महाकाय साप आहे. आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या जंगलात आढळणारा हा बिनविषारी साप (Non-venomous snakes) आहे. अजगराच्या तोंडात दात असतात आणि ते सुईच्या टोकासारखे टोकदार असतात. अजगर दातांचा वापर करून आपला भक्ष्य पकडतो आणि नंतर हळू हळू गिळतो. अख्खाच्या अख्खा माणूस देखील अजगर गिळू शकतो. त्याची चपळता देखील कमालीची असते. त्याची प्रचिती दर्शविणारा एक व्हिडिओ (Snake On Tree Video) सध्या समोर आला आहे.
अजगराचा एक व्हिडिओ (Viral Video Of Python Snake) सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांचे डोळे गरगरल्याशिवाय राहणार नाही. मनात धडकी देखील भरू शकते. त्यामुळे हलक्या काळजाच्या लोकांनी हा व्हिडिओ (Viral Video) पाहू नये, असा सल्ला नेटकरी देताना दिसत आहेत. एका महाकाय अजगराचा हा व्हिडिओ असून अनेकांनी मोठ्या प्रमाणात व्हिडिओ फॉरवर्ड देखील केलाय.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक अजगर झाडावर चढताना पहायला मिळतोय. हा व्हिडिओपाहून तज्ज्ञांना देखील आश्चर्याचा धक्का बसलाय. एखाद्या अजगराची चपळता एवढी कशी काय असू शकते? असा सवाल सर्पतज्ज्ञ विचारत आहेत. झाडाच्या खोडाला विळखा घातल अजगर भक्षाच्या शोधात झाडावर चढताना दिसतोय. आसपासच्या काही लोकांनी कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ (Trending Video) कैद केला आहे.
This is how a Python climbs a tree pic.twitter.com/AdogBKLgqn
— Perspective (@perspectivewow) December 23, 2022
दरम्यान, शरीराचा पुरेपूर वापर करत अजगर झाडावर झपझप झाडावर चढला. व्हिडिओ (Snake On Tree Video) पाहताना अनेकांच्या अंगावर काटा आलाय. @WowTerrifying नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. 9 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिल्यात. त्यामुळे आता हा व्हिडिओ आणखीनच व्हायरल (Shocking Video) होताना दिसू शकतो.