मुंबई : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काही काळ गोंधळात पडले होते. पंतप्रधानांचे टेलिप्रॉम्प्टर खराब झाल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अनेकदा असं म्हटलं जातं की, पंतप्रधान वेगवेगळ्या भाषांमध्ये संवाद साधण्यासाठी या उपकरणाचा वापर करतात. पंरतू त्यांच्याशिवाय अनेक नेते टेलिप्रॉम्प्टरचा वापर करतात. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ते रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांचा समावेश आहे.
1952 नंतर अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत पहिला वापर.
Teleprompter सारखे तंत्रज्ञान 1948 च्या सुमारास सुरू झाले. त्या वेळी, फ्रेड बर्टन या अभिनेत्यासाठी, दुमडलेल्या कागदांचा एक बंडल सूटकेसमध्ये ठेवला होता जेणेकरून टीवीवर बोलताना मुद्दा विसरल्यास त्यांना आठवण होऊ शकेल. परंतू कधीकधी ते शोधण्यासही त्यांना उशीर होत होता.
बर्टन यांनी ही व्यथा फॉक्सच्या मालकांकडे बोलून दाखवली. क्यू कार्डला मोटारने चालवलेल्या स्क्रोलशी जोडण्याची बर्टनची कल्पना होती जेणेकरून एक्झिट क्यू कार्ड कोणत्याही अडचणीशिवाय वाचता येईल. बेल्ट आणि पुलीच्या सहाय्याने मोठ्या अक्षरांचा कागद हळूहळू वर सरकणाऱ्या यंत्राने बर्टनची अडचण दूर झाली. तो ते वाचून मुक्तपणे बोलू लागला.
बर्टनला ते यंत्र श्लाफ्ली या अभियंत्याने तयार करून दिले होते. 1949 मध्ये त्याने टेलिव्हिजन प्रॉम्प्टर नावाच्या नवीन उपकरणाच्या पेटंटसाठी अर्ज केला. न्यू यॉर्क टाइमच्या मते हे उपकरण टीव्ही कलाकार आणि समालोचकांना एकही शब्द न चुकता माहिती प्रदान करण्यात मदत करीत होते.
नंतर जेस ओपेनहायमर नावाच्या एका चित्रपट निर्मात्याने इन-कॅमेरा टेलिप्रॉम्प्टरचे पेटंट घेतले. या उपकरणाने लेन्स, आरसा आणि प्रकाशाच्या योग्य वापराने वाचकांना शब्द अचूकपणे दाखवले. याला मॉडर्न डे टेलिप्रॉम्प्टर असे म्हणतात.याच्या सहाय्याने बोलणारी व्यक्ती, समोर लिहल्याप्रमाणे वाचू शकते आणि आपले सर्व मुद्दे न विसरता लोकांपर्यत पोहचवते. आजकाल अत्याधुनिक टेलिप्रॉम्प्टरद्वारे लोकांशी साधताना, आपण वाचून बोलतोय हे सहसा लोकांच्या लक्षात येत नाही.
1952 पासून, अध्यक्ष Herbert Hoover यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हे टेलिप्रॉम्प्टर वापरले होते. ते देखील प्रचारावेळी आपले मुद्दे नेहमी विसरत असत.
जेव्हा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना स्क्रिप्टेड प्रेसिडेंट म्हटले गेले
हे तंत्र अमेरिकेच्या अनेक राष्ट्राध्यक्षांनी वापरले. परंतु बराक ओबामा यांनी ज्या पद्धतीने ते वापरले, इतके त्यापूर्वी कोणीही वापरले नसेल. या मुद्द्यावर रिपब्लिकन त्यांच्यावर खूप टीका करीत असत. 2009 मध्ये, न्यूयॉर्क टाइम्समध्ये 'द (व्हेरी) स्क्रिप्टेड प्रेसिडेंट' या मथळ्यासह एक लेख प्रकाशित झाला.
या लेखात ओबामांनी टेलिप्रॉम्प्टरचा कसा वापर केला याबाबत तपशीलवार चर्चा केली आहे. त्यावर काहींचे म्हणणे होते की ओबामा लोकांपर्यंत आपला मुद्दा पोहचवण्यासाठी टेलिप्रॉम्प्टरचा योग्य वापर करीत आहेत. तर काही म्हणायचे की, त्यांचे बोलणे अधिक अनाठायी आणि लोकांच्या मनाला भिडणारे नव्हते. परंतू ओबामांनी
टेलिप्रॉम्प्टरचा अतिरेक केला असे बहुतांश लोकं मान्य करतात. असं म्हणतात की, अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बिडेनदेखील व्हिडिओ फीडची मदत घेतात.
फोनही न वापरणारे पुतीनदेखील करतात याचा वापर
रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन हे स्मार्टफोनसारख्या यंत्रांचा मर्यादित वापर करता असे म्हटले जाते. ते शक्यतो कागदी नोट्स जवळ बाळगतात. परंतू असे असले तरी पुतीनदेखील इंग्रजी भाषणांमध्ये टेलिप्रॉम्प्टरची मदत घेतात.
2019 मध्ये पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच हिंदी भाषणांसाठी केला टेलिप्रॉम्प्टरचा वापर
आपल्या इंग्रजी भाषणांसाठी वारंवार टेलिप्रॉम्प्टर वापरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा ते हिंदी भाषणासाठीही वापरले असल्याची माहिती मिळते. त्यानंतर या तंत्राबद्दल भारतीय माध्यमांमध्ये मोठी चर्चा झाली होती.