शिवसेना गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे घोसाळकर कुटुंबियांवर मोठं संकट कोसळलं. पत्नी तेजस्वी घोसाळकर यावर व्यक्त होताना दिसते. तेजस्वी घोसाळकरने पुन्हा एकदा एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने पतीचा विरहाबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे. जोडीदाराच्या निधनानंतर कशा पद्धतीने त्या परिस्थितीवर मात करावी हे समजतं नाही. अशावेळी नेमकं काय करालं?
तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं आहे की, तू माझं नाव घेत असल्याचा मला भास होतो, पण मागे वळून पाहिल्यावर तू तेथे नसतोस. तुझी खूप आठवण येते, अशा पद्धतीने तेजस्वी घोसाळकरने आपली भावना व्यक्त केली आहे.
(हे पण वाचा - 'आपण पुन्हा भेटू...' लग्नाच्या वाढदिवशी अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची भावूक पोस्ट)
अशा परिस्थितीवर मात करणं अत्यंत गरजेचं असतं. अनेकदा आपल्या कुटुंबासाठी किंवा मुलांसाठी आपलं दुःख मनात ठेवून पुढे चालत राहणं गरजेचं आहे. अशावेळी तुम्ही जोडीदाराचा विरह कसा सहन कराल?
सत्य स्वीकारा - परिस्थिती स्वीकारणं ही या स्थितीवर मात करण्याची पहिली पायरी आहे. सुरुवातीला लोकांच्या मदतीने ही परिस्थिती स्वीकारा. आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत, नातेवाईकांसोबत राहा. हीच माणसे तुम्हाला सुरुवातीचे काही दिवस सहन करण्याची ताकद देतील. आठवणी जपून ठेवा. तुमच्या आवडत्या व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी तुम्ही काहीतरी करू शकता. एक झाड किंवा बाग लावा ज्यासोबत तुम्ही वेळ घालवू शकता.
स्वतःला रोखू नका - व्यक्त होणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी तुम्ही रडण्यापासून स्वतःला रोखू नका. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने "वाटले पाहिजे" असा विचार करण्याऐवजी तुमच्या भावना स्वीकारा. काहीवेळा, तुम्ही या परिस्थितीवर मात करुन पुढे जावे असे अनेकांना वाटत असेल. तेव्हा तुम्ही तुम्हाला जमेल तितका वेळ घ्या. जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याबद्दल बोला. काही लोकांना आपल्या भावना शब्दात व्यक्त करायच्या असतात. अशावेळी बोला, लिहा पण व्यक्त व्हा.
व्यक्त व्हा - जर तुम्हाला बोलायला आवडत नसेल तर तुमच्या भावना आणि विचार व्यक्त करण्याचे मार्ग शोधा. तुम्ही जर्नलमध्ये लिहू शकता. किंवा तुम्ही एखादे गाणे, कविता लिहू शकता किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीबद्दल फोटो ट्रिब्यूट करू शकता. तुम्ही हे फक्त तुमच्यासाठी करू शकता किंवा तुम्ही ते इतरांसोबत शेअर करू शकता.
मेमरी बॉक्स किंवा फोल्डर बनवा - जवळच्या व्यक्तीचा विरह सहन करण्यासाठी आठवणी जमा करा. यावेळी सोबत घालवलेले क्षण आठवता. त्या आठवणीत जपण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हवे असल्यास त्या व्यक्तीला पत्र लिहा. त्यामध्ये, तुम्ही तुमच्या भावना आणि तुम्हाला सांगू इच्छित असलेल्या गोष्टींचा समावेश करू शकता. काही लोक कृतज्ञता पत्र लिहितात. आपल्या जीवनाचा एक भाग असल्याबद्दल आपल्या प्रिय व्यक्तीचे आभार मानण्याचा हा एक मार्ग आहे.
सल्ला घ्या - अनेकदा जोडीदाराचा विरह सहन होत नाही अशावेळी थेरपिस्ट किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण कितीही विचार केला तरी आपण अशा परिस्थितीवर मात करु शकत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन थेरेपी घेऊन नक्कीच मदत करेल.