नाशिकमध्ये बालभारतीच्या कार्यालयात दारूचे धडे, अधिकाऱ्यांची तर्राट पार्टी

राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये 'वाईन विक्री'चा निर्णय घेतला. त्याला राज्यभरातून विरोध होत आहे. तर, विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी सरकारचा कित्ता गिरविला आहे.

Updated: Apr 7, 2022, 04:06 PM IST
नाशिकमध्ये बालभारतीच्या कार्यालयात दारूचे धडे, अधिकाऱ्यांची तर्राट पार्टी title=

नाशिक : महाविकास आघाडी सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संपूर्ण मार्केटमध्ये 'वाईन विक्री'चा निर्णय घेतला. या निर्णयाला राज्यभरातून विरोध झाला. त्यानंतर आता राज्यसरकारने या निर्णयावर जनतेमधून हरकती आणि सूचना मागविल्या आहेत.

आपल्याच निर्णयाविरोधात राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतले असताना महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक भांडार व वितरण केंद्र बालभारती नाशिक येथे शिवसेनेने स्ट्रिंग ऑपरेशन केले. या दरम्यान बालभारतीच्या सदर कार्यालयातील एक अधिकारी नशापान करताना आढळून आला.

नाशिकच्या बालभारती कार्यालयातील भांडार व्यवस्थापक लक्ष्मण यशवंत डामसे हे कार्यालयीन कामकाज सुरू असताना नशापान करून काम करत असल्याचे आढळून आले. सदर अधिकार्‍याचा हा आधुनिक शिक्षण कार्यक्रम दिवसाढवळ्या बालभारती पुस्तकांच्या गोदामात सुरु होता.

व्यवस्थापक डामसे यांनी मारी बिस्किटसोबत चहा नव्हे तर दारू पिताना आढळून आले. या अधिकाऱ्याना दारू सेवन करताना शिवसैनिकांनी या रंगेल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले. शिवसैनिकांनी त्या अधिकाऱ्याला अंबड पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच, या दारुबाज कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची मागणी शिवसैनिकांनी केलीय.