New Year Travel : जगभरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु आहे. तुम्ही आम्ही सगळे जण सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काही ना काही प्लन करतात आहात. अनेक जण सुट्टी घेऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर जातात. या दिवसांमध्ये पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. हॉटेल आणि रिसार्टमध्ये धुमधडाक्यात पार्टी करायला सगळ्यांच आवडतं असं नाही. न्यू इयर पार्टी म्हटलं की, सर्वात आवडतं ठिकाणं म्हणजे मुंबई. पण अनेकांना शांत जागी निसर्गाच्या सान्निध्यात नवीन वर्षाचं स्वागत करायला आवडतं. त्यामुळे आज आम्ही मुंबईशिवाय महाराष्ट्रात तुम्ही कुठे नवीन वर्षाचं स्वागत करु शकता या बेस्ट ठिकाणाबद्दल सांगणार आहोत.
महाराष्ट्र हा देखील निसर्गाने नटलेला आहे. हिवाळ्यात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणंच सौंदर्य डोळ्याच पारण फेडणार असतं. तुम्ही न्यू इयर पार्टीसाठी कोकणातील अनेक बीचवर जाऊ शकतात. त्यातील सर्वात प्रसिद्ध असलेले अलिबाह हे ठिकाणं तर बेस्ट ऑप्शन आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर मुंबईपासून सुमारे 96 किमी अंतरावर असून त्याला महाराष्ट्रातील मिनी गोवा म्हटलं जातं. हे शहर तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेले असून अनेक समुद्रकिनारे आहेत, जिथे रिसॉर्ट आणि फार्म हाऊसमध्ये रूम बुक करून नवीन वर्षाच्या पार्टीचा आनंद तुम्ही मनमुराद घेऊ शकता.
त्यानंतर पुण्या जिल्ह्यात लोणावळा तर हिवाळ्यात जणू स्वर्ग सुखाचा आनंद देतो. महाराष्ट्रातील हे लोकप्रिय हिल स्टेशन पर्यटकांची पहिली पसंती असतं. देश विदेशातील असंख्य पर्यटक इथे कायम येत असतात. निसर्गाच्या सान्निध्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. लोणावळ्यातील अनेक रिसॉर्ट्स आणि व्हिलामध्ये नवीन वर्षाच्या पार्ट्या रात्रभर सुरू असतात शिवाय लोणावळ्यात बुशी डॅम, राजमाची पॉइंट, पवना तलाव आणि कार्ला लेणींना या बघण्यासारख्या आहेत.
तिसरं ठिकाण आहे, अहमदनगर जिल्ह्यात स्थित भंडारदरा, हे हिल स्टेशन पर्यटकांची पसंतीला उतरलंय. भंडारदरा हा हॉलिडे रिसॉर्ट पावसाळा आणि हिवाळ्यात खूप प्रसिद्ध आहे. भंडारदरामधील हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि व्हिलामध्ये नवीन वर्षाच्या पार्ट्या मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात येतात. भंडारदरा येथील पार्टीचा आनंद लुटल्यानंतर, रतनगड किल्ला, आर्थर तलाव, विल्सन डॅम आणि अंब्रेला फॉल्स यांसारखी अद्भुत ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.
मुंबईनंतर पुण्यातही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात येते. इथल्या अनेक बार, रिसॉर्ट्स आणि व्हिलामध्ये न्यू इयर पार्टीसाठी मोठ्या संख्यने लोक येत असतात. तुम्ही 5 ते 6 हजार रुपयांमध्ये नवीन वर्षाची पार्टी पुण्यात करु शकता.
त्यासोबत तुम्ही नवीन वर्षाच्या पार्टीचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वर, नाशिक, संभाजीनगर, पंचमढी, भंडारदरा या ठिकाणीही जाऊ शकता.