योगेश खरे, नाशिक:
गिफ्ट म्हटले प्रत्येकास लोभ सुटतो त्यात परदेशातून गिफ्ट येणार अस म्हटलं तर आकाश ठेगणे यासाठी काही खर्च करावा लागला तरी आपण करतो. मात्र यात फसवणूक ही होऊ शकते.. असेच काहीस घडलं आहे नाशिकमध्ये.
परदेशातून एक विशिष्ट गिफ्ट पाठविण्याच्या नावाखाली नाशिक मध्ये जेष्ठ महिलेला ११ लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. पैसे देऊन दोन महिने उलटून सुद्धा गिफ्ट मिळाले नसल्याने अखेर सायबर पोलीस ठाण्यात डॉ. अॅलेक्स आणि त्याच्या साथीदाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काय आहे प्रकार
नाशिक शहरातील गंगापूररोड येथील रामेश्वरनगरमध्ये ७२ वर्षीय महिला डॉक्टर राहतात. परदेशातील वैद्यकीय सुविधा देणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून एका महिलेने नाशिक मधील वृद्ध डॉक्टरशी संपर्क साधला. संशयित महिलेने संस्थेच्या कामाची माहिती वृद्ध डॉक्टरला दिली. वृद्ध महिला डॉक्टर घरची चांगली असल्याचे समजताच त्यांच्याशी संपर्क वाढविण्यात आला. त्यांना संस्थेला मदत करण्याची विनंती करण्यात आली. वृद्ध महिलेने संस्थेला ३० हजार रुपयांची मदत केली.
अशी झाली फसवणूक
यानंतर संस्था प्रमुख डॉ. अॅलेक्स याने संस्थेला मदत केल्याबद्दल महिलेचे आभार मानले. यावेळी संस्थे कडून विशेष गिफ्ट पाठवत असल्याच आमिष दाखवण्यात आल. गिफ्ट पाठविण्याकरिता मनी लॉड्रीग क्लियरन्स सर्टिफिकेट, पोलीस क्लियरन्स सर्टिफिकेट, आणि मनी एक्स्चेंज करिता पैश्यांची मागणी करण्यात आली. महिंद्रा (९५४६५३६२२६) आणि युनियन (०१५१२२०१००००६१४) बँकेच्या खात्यात वेळोवेळी पैसे मागवण्यात आले. सहा जून ते १७ ऑगस्ट पर्यंत या खात्यात वृद्ध डॉक्टर महिलेने ११ लाख २३ हजार रुपये वर्ग केले. दोन महिने झाले तरी गिफ्ट आलेच नाही
अखेर पोलीस तक्रार
या संपूर्ण प्रकरणात आपली फसवणूक केली असल्याच वृद्ध महिलेच्या लक्षात आल्याने अखेर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे मात्र सातासमुद्रापार आणि वेगवेगळ्या सर्वर चा वापर करून हे कॉल झालेले असल्याने आरोपी पकडणे कठीण होऊन बसले आहे
काय घ्यावी काळजी
आपल्या बँकेच्या अकाउंट बद्दल कोणालाही काहीही शेअर करू नका
यूपीआय ऍड्रेस तयार करताना सतत काळजी घ्या त्या बँक अकाउंट मध्ये आपले कमीत कमी पैसे ठेवा
गिफ्ट बोनस व नोकरी अशा कुठल्याही आमिषांना बळी पडू नका तुमच्या गरजेच्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला फसवले जाऊ शकते
आपल्या मेहनतीने मिळवणाऱ्या पैशावर विश्वास ठेवा फुकटात मिळणाऱ्या कुठल्याही गोष्टी आपल्यासाठी आर्थिक लुटीचे मार्ग ठरू शकतात