यवतमाळ : दोन बायकांच्या वादातून केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम आणि त्यांची दुसरी पत्नी प्रिया शिंदे यांना बेदम मारहाण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. पांढरकवडा इथल्या वाय पॉईंटवर त्यांच्या वाढदिवशी ही बेदम मारहाणीची घटना घडली. आमदार तोडसाम यांची पहिली पत्नी अर्चना आणि तिच्या कुटुंबियांनी जाहीरपणे ही मारहाण केली. सध्या राजू तोडसाम आणि त्यांची दुसरी पत्नी प्रिया यवतमाळच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आमदार तोडसाम यांना पहिल्या पत्नीपासून अपत्ये आहेत. पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन त्यांनी प्रिया शिंदे यांच्याशी दुसरा विवाह केला. याच रागातून हा हल्ला झाल्याचे आमदार तोडसाम यांनी सांगितले.
आमदार राजू तोडसाम यांच्या वाढदिवशी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पांढरकवडाच्या वाय पॉइंट परिसरात ही हाणामारी झाली. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती. पहिल्या बायकोने दुसऱ्या बायकोला चप्पलेने मारहाण केली. वर्षभरापूर्वी राजू तोडसाम यांनी दुसरा विवाह केला.
भाजप आमदाराच्या घरातला हा कलह चव्हाट्यावर आणण्यामागे षडयंत्र असल्याचा आरोप तोडसाम दाम्पत्याने केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी पोलीस काय कारवाई करतायत, याकडं सर्वांचं लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार तोडसाम यांची भाजपातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शेतकरी प्रश्नांचे आंदोलक किशोर तिवारी यांनी केली आहे.