पुणे : नेहमी ग्रामीण भागात पाहायला मिळणारा सामुदायिक विवाह सोहळा पुण्यातही अनुभवता आला. हा सोहळा काहीसा वेगळा होता. कारण या सोहळ्यांमध्ये एक - दोन नाही, तर तब्बल २२ दिव्यांग जोडप्यांनी विवाहगाठ बांधली.
क्रिस्प फाऊंडेशनतर्फे आयोजित या सोहळ्याला पुण्यातल्या विविध संस्थांनीही वेगवेगळ्या माध्यमातून हातभार लावला. एवढंच नाही तर लग्नामध्ये दिली जाणारी शाल आणि दागिनेही यावेळी वधुवरांना भेट देण्यात आले.
मंगलाटष्का झाल्या, विधीही झाले आणि वधुवरांनी उखाणेही घेतले. हे सगळं प्रत्यक्ष पाहता येत नसलं, तरी हे सगळं काही या दिव्यांग जोडप्यांनी मनापासून अनुभवलं. आपल्या मुलांचा थाटात झालेला असा लग्न सोहळा पाहून त्यांचे कुटुंबीयही भारावून गेले.
आयुष्याच्या जीवनप्रवासात प्रत्येकाला एका जोडीदारांची गरज असते. क्रिस्प फाऊंडेशननं ४४ दिव्यांगांबाबत हेच उदात्त कार्य प्रत्यक्षात उतरवले.