मयुर निकम, झी मीडिया बुलढाणा: बुलढाण्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं. कोरोना आणि लॉकडाऊन मधून सावरत असताना पावसानं सगळं शेत धुवून काढलं. 28 जून रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली सिंदखेड राजा मेकर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं.
या मुसळधार पावसानं चिखली तालुक्यात तर अंबाशी आणि आमखेड धरणं अक्षरशः फुटली. त्यामुळे नद्यांनीही रौद्र रूप धारण केलं होतं. तर अनेकांची शेती जमीनदोस्त झाली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी डोक्याला हात लावला. झी 24 तासचा रिपोर्टर मयुर निकम ज्यावेळी घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथल्या शेतकऱ्यानं अक्षरश: खांद्यावर डोकं ठेवून धाय मोकलून रडला.
लॉकडाऊनमधून वर सरत आता कुठे थोडं नीट होईल असं वाटत असताना आस्मानी संकट आलं आणि सगळं पिक वाहून गेलं. सांगा कसं जगायचं असा प्रश्न त्याचं धाय मोकलून विचारला. या परिसरातील शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी झी24 तासचे रिपोर्टर मयूर निकम गेले असता बळीराजाला आपले अश्रू अनावर झाले नाही. आपली व्यथा सांगत या शेतकरी मयुर निकम यांच्या खांद्यावर डोके ठेवून ढसाढसा रडला
एककीकडे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांची अशी परिस्थिती झी 24 तासचे रिपोर्टर मयुर निकम यांनी पुढे आणली. शेतकऱ्यांनी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवत आपली व्यथा मांडली.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या अतिवृष्टीमुळे अंबाशी धरणाची भिंत खचली तसेच आमखेड धरण फुटल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. झी 24 तासने अंबाशी धरणाच्या खचलेल्या भिंतीची बातमी लावताच प्रशासन खडबडून जागं झालं. या बातमीनंतर यंत्रणा कामाला लागली. जेसीबीच्या सहाय्याने धरणाच्या उजव्या बाजूने सांडवा खोल आणि रुंद करण्याचे काम प्रशासनानं हाती घेतलं.