मुंबई : Devendra Fadnavis Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यात नवे सरकार आले. या नव्या सरकारचे अधिवेशन उद्यापासून होणार होते. (Maharashtra Assembly Session) मात्र, आता अधिवेशनाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशनाचे विशेष सत्र 3 आणि 4 जुलैला होणार आहे. उद्या विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरण्यासाठी मुदत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशन तारखेत बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अधिवेशनाचे विशेष सत्र तीन आणि चार जुलैला होणार आहे.
दरम्यान, उद्या अध्यक्षपदाचा अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी आणि सोमवारी होणार अधिवेशन होईल आणि रविवारी अध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे बोलावण्यात आलेले विशेष अधिवेशन एका दिवसासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. आता हे अधिवेशन 3 आणि 4 जुलैला बोलावण्यात येणार आहे. शनिवारी बोलावण्यात आलेल्या या सत्राच्या पहिल्या दिवशी फ्लोर टेस्ट होणार होती.
दुसरीकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गोव्यात दाखल झालेल्या एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह गोव्यात पक्षातील महत्त्वाची बैठक घेत आहेत. गोव्यात सकाळी 11 वाजता ही बैठक सुरु झाली आहे. अशा स्थितीत आज सर्व बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे.