पुणे : अयोध्येतील श्रीराम मंदिर भुमिपुजनाचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असले पाहिजे असे मतं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्थ आचार्य किशोरजी व्यास म्हणजेच गोविंद गिरी महाराज यांनी व्यक्त केलंय. मंदिर समितीकडून अद्याप उद्धव ठाकरेंना निमंत्रण न आल्यानं राज्यातील राजकारणात याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभुमीवर गोविंद गिरी यांचे विधान महत्वाचे मानले जातंय. उद्धव ठाकरेंचं नव्हे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना निमंत्रण गेलं पाहिजे असेही म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिरबाबत मोठी भूमिका घेतल्याचेही ते म्हणाले.
निमंत्रण कुणाला द्यायचं आणि नाही याबाबत गंभीर चर्चा सुरू आहे. ज्यांची गरज आहे त्यांनाच बोलावलं जाईल. देशातील मुख्यमंत्र्यांना बोलावण्याबाबत विचार सुरू असल्याचे गोविंद गिरी महाराज म्हणाले. हेलिकॉप्टर ने येण्यासाठी काही अडचणी आहेत. ज्यांना यायचं आहे त्यांनी आधीच्या दिवशी यायचं का याबाबत विचार सुरु असल्याचे ते म्हणाले.
राम मंदिर राष्ट्राच्या स्वाभिमानाचा मुद्दा आहे. राष्ट्राचे मनोबल वाढविण्यासाठी आणि कोरोनाला हरविण्यासाठी हा सगळा उत्सव आहे. अयोध्येतील उत्सव सुरू असतांना घरातच सर्वांनी दिवाळीप्रमाणे उत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले.
तीन ते साडेतीन वर्ष मंदिराच काम सुरू असेल पण तीन वर्षांच्या आत मंदिराच काम होईलं. भारतीय परंपरे प्रमाणेच मंदिर होईल. व्यापक विस्तार कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. १०८ एकर जमीन पूर्ण करण्याचा आमचा विचार आणि त्यात काही दान असेल तर काही खरेदी केली जाणार आहे.
- मंगल क्षण दृष्टीपथात आला आहे, तो आता पूर्णत्वास जातोय
- पाचशे वर्षांपासून संघर्ष सुरू होता
- ज्या क्षणाची वाट पाहात होतो तो आलाय
- न्यासाची स्थापना झाली त्यात माझं नाव आलं त्यात मी कोषाध्यक्ष
- मध्ये एक आवई उठली, पंतप्रधान ऑनलाइन उद्घाटन करून घ्यावे त्याला माझा विरोध केला
- त्यानंतर मी बोललो काही बैठका झाल्या आणि त्यात दोन मुहूर्त दिले होते
- त्यात ५ ऑगस्ट ला मुहूर्त ठरला आहे
- मंदिर स्वरूप १६१ फुटाचं बांधकाम असेल
- दोन मजली मंदिर आणि त्यावर पाच शिखर असतील पूर्वी दोन शिखर होणार होतील
- गुजरात मधील सोमपुरा परिवार करणार मंदिराचे काम
- बंगालच वादळ आणि अशी अनेक संकट आली त्याठिकाणी पंतप्रधान जातात
- राम मंदिर बाबत अनेक वर्षाचं संकट म्हणून थेट पंतप्रधान उपस्थित
- काही लोकांना मोदींच नाव घेतलं तरी पोटात दुःखत
- तेथ नेहरू खानदानी पद्धतीनं गेले नव्हते
- मोदी कोरोनात इतकं काम करताय तितकं कुणीही करत नाही
- ऐतिहासिक काम करताय त्यामुळे संपुर्ण देशात प्रसन्नता पसरली जाईल
- सगळे जण उत्सव साजरा करतील