रत्नागिरी : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढ असल्याचे खबरादारी म्हणून गणपतीपुळे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता मोठ्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे. देऊळबंदच्या निर्णयामुळे पर्यटकांची संख्या रोडावली असून त्याचा परिणाम हा आता हॉटेल व्यवसायावर होताना दिसत आहे.
कोरानामुळे सध्या मोठा आर्थिक फटका बसतोय ही दुसरी बाजू. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून रत्नागिरीतल्या गणपतीपुळे येथील देऊळबंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, त्याचा परिणाम हा आता हॉटेल व्यवसायिकांना बसतोय...हॉटेल व्यावसायिक उमेश भन्सारी याठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे पर्यटन व्यवसाय करतात मात्र कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे एप्रिल आणि मे महिन्यातील हॉटेल बुकिंग रद्द झाली आहेत. हॉटेल आता ओस पडली आहेत. त्यामुळे कोरोनामुळे इथले हॉटेल व्यवसायिक मोठ्या अडचणीत सापडला आहे.
केवळ मोठे व्यवसायिकच नाहीत तर छोट्या उद्योगधंद्यांना देखील याचा फटका बसला आहे. हे आहेत अजय ठावरे शहाळे अर्थात नारळ पाणी विकण्याचा यांचा धंदा. पण, कोरोनामुळे देऊळबंद करण्याचा निर्णय झाला आणि त्यांना देखील या फटका हा मोठ्या प्रमाणावर बसला आहे. ठावरे हे केवळ एकटेच नाहीत तरअनेक जण सध्या सारख्याच परिस्थितीला सामोरं जात आहेत. गणपतीपुळ्यात फोटोचा व्यवसाय करणारे हे आहेत विनोद पवार. पण, त्यांना देखील या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. फोटोवर त्यांचा सारा उदरनिर्वाह अवलंबून. पण, सध्या मात्र ओस पडलेले ,समुद्र किनारे आणि मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी फिरवलेली पाठ सध्या त्यांच्यासाठी मारक ठरत आहे.
सध्या कोकण किंवा रत्नागिरीतील परिस्थिती चिंताजनक नसली तरी त्याबाबत योग्य ती खबरदारी घेतली जातेय...त्यापैकीच हा निर्णय म्हणजे देऊळबंदचा होय. याबाबत आता गणपतीपुळे ग्रामपंचायत देखील आता सतर्क झाली आहे. पावसाळ्यात देखील कोकणातल्या जनतेला, व्यवसायिकांना मोठा फटका बसला...त्यानंतर आता कुठं तरी सावरता येईल आणि उभं राहता येईल ही एक आशा होती...पण, ती देखील कोरोनामुळे फोल ठरली...वर्षभराचं सारं आर्थिक गणित हे या 2 ते 4 महिन्यांवरच...पण, आता कोरोनाचा फटका बसलाय..त्यामुळे कोरोनाचं हे वैद्यकिय संकट व्यवसायिकांना मोठं आर्थिक नुकसान देणारं ठरतंय हे नक्की!