मुंबई : राज्याची वाटचाल अनलॉकच्या दिशेने सुरु झालीय. त्यामुळे दुकानं, मॉल्स खुले झालेय. या पार्श्वभुमीवर मंदिर उघडण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय.
धार्मिक स्थळं उघडायला हवीत परंतु धार्मिक स्थळं उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. या संदर्भात एक नियमावली ठरवावी लागेल, मी सरकारशी बोलतो. कारण मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत दोन दिवस द्या असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणालेयत.
मंदिर खुली झाली पाहिजेत अस राज ठाकरे यांच मत आहे. हा प्रश्न फक्त त्र्यंबकेश्वरचा नाही तर राज्यभरातला असल्याचे मनसे नेते नितीन सरदेसाई म्हणाले.त्यामुळे शासकीय पातळीवर राज ठाकरे बोलणार आहेत. त्यानंतर पुन्हा या महंतांच्या शिष्टमंडळाला भेटणार असल्याचे सरदेसाई म्हणाले.