मुंबई : Maharashtra Political Crisis : शिवसेनेने भाजप आणि राज्य तसेच केंद्र सरकावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. इतके दिवस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन मंत्रिमंडळ होऊ शकत नाही. सध्याच्या राजकारणात नवीन सिनेमा सुरु आहे, तो म्हणजे 'एक दुजे के लिए'. आता पडदावर त्याचा अंत सुद्धा त्याच पद्धतीने होईल. तसेच संसदेत प्रखर बोलण्यावरती बंदी आणली आहे. ही केंद्राकडून लोकशाहीची मुस्कटदाबी आहे. सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा पाया कापण्याचा आणि पंख छाटण्याचे काम सुरु आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांची स्थिती काय होते हे माहीत आहे. आमदार आणि खासदार हे पराभूत झाल्याचा इतिहास आहे. ज्यांनी शिवसेना सोडलेली आहे आणि शिवसेनेचा वापर करुन सानभुती मागू नका. तुम्ही स्वतःचा स्वतंत्र पक्ष तयार करा. तुम्ही शिवसेना शिवसेना का करता? बाळासाहेब ठाकरे यांची ही खरी शिवसेना आहे, या शिवसेनेच्या पंखाखाली तुम्ही का जगता? तुम्ही स्वाभिमानासाठी बाहेर पडला असाल तर तुम्ही तुमचं स्वतंत्र स्थान निर्माण करा. शिवसेनेचा गैरवापर करु नका. हकालपट्टी करण्यात आलेले असे अनेक लोक आहेत, जे शिवसेना - भाजप युती असताना पराभूत झालेले. त्यांना आता भाजपचा पुळका आला आहे. बंडखोर नेत्याला असं बोलावं लागतं त्याच्याविषयी आम्हाला काही आक्षेप नाही. मात्र, स्पष्ट सांगतो, ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून अनेक वर्ष हद्दपार आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी यावेळी केला.
संसदेत आता प्रखर बोलण्यावरती बंदी आणली आहे. खरे बोलण्यावर बंदी आणणे म्हणजे एक प्रकारे लोकशाहीचा गळा घोटणे आहे. विरोधी पक्षाची बैठक मालिका अर्जुन खरगे यांच्या नेतृत्वात बोलवण्यात आले आहे. संसदेत लोकशाहीची भीती एखाद्या सरकारला वाटत असेल? हे सरकार लोकशाहीच्या मार्गाने निवडून आले आहे. त्यांच्याकडून जर अशी मुस्कटदाबी होणार असेल तर या देशात लोकशाही आहे का हा प्रश्न निर्माण होईल, असे संजय राऊत टीका करताना म्हणाले.