बीड : जिल्ह्यात झालेल्या गारपिटीनं तालुक्यातील साडेदहा हजार हेक्टर पिक जमीनदोस्त झाली. सरकारनं तातडीनं पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करू लागलेत.
बीड जिल्ह्यात गारपिटीचा सर्वाधिक फटका गेवराई तालुक्याला बसला. या तालुक्यातील चार ते पाच हजार हेक्टरवरील गहू,हातभार,ज्वारी,मका या पिकांचं आतोनात नुकसान झालंय.गेवराईसह माजलगाव तालुक्यातील पिकांना देखील मोठा फटका बसलाय. शासनानं तातडीनं पंचनामे करून योग्य ती मदत द्यावी अशी मागणी माजी जिल्हापरिषद अध्यक्षांनी केलीय.
वर्धा जिल्ह्यातील देवळी आणि आर्वि तालुक्यांना गारपीटीचा तडाखा बसाला. चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यानं शेतकरी चिंतातूर झाला होता. अखेर सोमवारी झालेल्या गारपीटीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी गारपीट झाली.
हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात दुसऱ्या ही दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. परभणी जिल्ह्यातील चुडावा परिसरात वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून चार शेतमजूर आणि जनावरे जखमी झाल्याची घटना घडली,जखमी पैकी ३५ वर्षीय एक महिला पावसापासून बचाव करण्यासाठी गोठ्यात गेली असता,गोठा पडून महिलेचे मृत्यू झाल्याची घटना घडली.