नाशकात दिवाळीत फटाके फोडता येणार, बंदीचा ठराव फेटाळला

 ​Nashik Firecrackers News : दिवाळीत (Diwali) फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, नाशिक मनपाने फटाके बंदीचा ठराव फेटाळला आहे. 

Updated: Oct 20, 2021, 02:38 PM IST
नाशकात दिवाळीत फटाके फोडता येणार, बंदीचा ठराव फेटाळला title=
संग्रहित छाया

नाशिक : Nashik Firecrackers News : दिवाळीत (Diwali) फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, नाशिक मनपाने फटाके बंदीचा ठराव फेटाळला आहे. फटाक्यांवरील बंदी उठल्याने येवल्यातील विक्रेत्यांनी जल्लोष केला आहे. येवला फटाके विक्रेत्यांनी मानले पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले आहे. (Firecracker ban resolution rejected in Nashik)

उत्तर महाराष्ट्रमध्ये विभागीय आयुक्त यांनी 5 जिल्ह्यांमध्ये फटाके विक्रीवर आणि उडवण्यावर  बंदी घातली होती. त्यामुळे खरेदी केलेले फटाक्यांची विक्री कशी करावी, असा प्रश्न या विक्रेत्यांना पडला होता. मात्र पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर फटाक्यावरील बंदी मागे घेण्यात आली आहे. त्याचवेळी नाशिक पालिकेनेही बंदीचा ठराव फेटाळला आहे. यामुळे येवल्यातील फटाके विक्रेत्यांनी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला. फटाकेवरील बंदी उठल्याने विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. 

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वसामान्यांसह दुकानदारही दिवाळीच्या तयारीला लागले आहेत. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरात फटाक्याच्या दुकानांसाठी गाळ्यांचं वाटपही सुरु झाले. सर्व तयारी सुरु असतानाच महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाक्यावर बंदी आणण्याचा प्रस्ताव महासभेत सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार हा प्रस्ताव सादर करण्यात आला. आता मनपाने बंदीचा ठराव फेटाळला आहे.

आयुक्त गमे यांच्या प्रस्तावामुळे यंदाची दिवाळी फटाक्याविना जाणार का, असा सवाल उपस्थित झाला होता. आता बंदीचा ठराव फेटाळण्यात आल्याने दिवाळीत फटाके फुटणार आहेत. प्रदूर्षण रोखण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने फटाके विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा ठराव मंजूर करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्राद्वारे केली होती. त्यामुळे यावर्षीची दिवाळी फटाक्याविना साजरी करावी लागण्याची चिन्हे होती.

विभागीय आयुक्तांच्या या पत्रानुसार नाशिक, धुळे, जळगाव,  नंदुरबार आणि अहमनगर जिल्ह्यात ठराव झाल्यास दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी करावी लागणार अशी स्थिती होती. माझी वसुंधरा अभियानाच्या प्रारूप टूलकीटनुसार  हवेची गुणवत्ता राखण्यासाठी 15 ऑक्टोबरच्या आधी ठराव मंजूर करुन 22 ऑक्टोबरपर्यंत त्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध होणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी आपल्या पत्रात म्हटले होते. मात्र, फटाके बंदीचा ठराव फेटाळण्यात आला आहे.