जळगाव : शिवसेना आमदार आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थिती बिकट असताना घरच्या व्यक्तीला बँकेचं चेअरमन केलं आणि स्वतःच्या कारखान्याला ५१ कोटी रुपयांचं कर्ज दिलं, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर केला आहे. जिल्हा बँक कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे शेतक-यांना कर्ज मिळत नाही. मात्र खडसेंच्या कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा असल्याने त्यांच्या मुक्ताई सहकारी साखर कारखान्याला कर्ज कसं मिळतं असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंवर केला आहे.