मुंबई : Heavy rains in Maharashtra : गेले दोन दिवस राज्यात चांगला पाऊस कोसळत आहे. कोकणात गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरुच आहे. मात्र, काल उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला तर जळगाव जिल्ह्यात पुराने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, येत्या 24 तासांत राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकणातील पालघरमध्ये रेड ( Red Alert in Palghar) अलर्ट तर ठाण्यासह उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Heavy rains in Maharashtra in next 24 hours, red alert in Palghar)
राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. दरम्यान, पुढील 24 तासांत राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पालघरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे आणि उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तसेच आज मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मराठवाड्यात पावसाने दाणादाण उडवली आहे. 67 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद आहे. खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झाले आहे.
Nowcast warning issued at 0100 Hrs 1Sept : Mod to intense spells of rain very likely to occur at isolated places in the districts of Mumbai,Thane,Palghar, Raigad during next 3-4 hours. Possibility of thunder/lightning accompanied with gusty winds in some areas.
-IMD MUMBAI— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 31, 2021
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्र राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, कोकणासह मराठवाड्यात बुधवारी मुसळधारांचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने मंगळवारी मराठवाड्यासह अहमदनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत हाहाकार उडवला. पुरात सात नागरिकांसह शेकडो जनावरे वाहून गेली. अतिवृष्टीमुळे शेतीचेही नुकसान झाले. अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कन्नड घाट आठ दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.