Maharashtra Breaking News LIVE Updates: धस-मुंडे भेटीनं वादंग; कोणी मध्यस्थी केली नाही - धस

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर...

Diksha Patil | Feb 14, 2025, 19:44 PM IST
Maharashtra Breaking News LIVE Updates: धस-मुंडे भेटीनं वादंग; कोणी मध्यस्थी केली नाही - धस

Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरात काय काय झालं.. महत्त्वाच्या घडामोडी काय आहे. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर 

14 Feb 2025, 12:08 वाजता

बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय

-- धनंजय देशमुख यांचा खळबळजनक दावा
-- आरोपींना कोर्टात आणलं जातं तेव्हा टीम अवतीभवती असते.
-- ही बी टीम आरोपींना सर्व प्रकारची मदत करत असते'
-- मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची माहिती
-- हे लोक असे समर्थन करतात जसं याचं कोणीच काही करु शकत नाही- धनंजय देशमुख

 

14 Feb 2025, 10:12 वाजता

कोल्हापूरमध्ये गांजासह MD ड्रग, कोकेण विक्रीच्या रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश 

कोल्हापूरमध्ये गांजासह MD ड्रग, कोकेण विक्रीच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या कारवाईत 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. जानेवारीपासून कोल्हापूरमध्ये गांजा विक्री आणि सेवन प्रकरणी 77 गुन्हे दाखल झाले. यामध्ये तब्बल 108 जणांवर कारवाई झाली.  तर 124 किलो गांजा जप्त करण्यात आलाय.

 

14 Feb 2025, 10:09 वाजता

सिंधुदुर्गातील राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाला वेग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या पूर्णाकृती पुतळयांच्या कामाला वेग आलाय. तब्बल 60 फूट उंच असलेला पुतळ्याचे  काही भाग मालवणमध्ये दाखल झाले आहेत. टप्प्या टप्प्याने हे सर्व भाग राजकोट येथे आणण्यात येणार असून लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. 

14 Feb 2025, 10:08 वाजता

तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबत आज महत्त्वाची बैठक

- आशिष शेलारांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज बैठक

- मंदिराच्या मुख्य गाभा-यातील प्राचीन शिळांना तडे

- पुजारी मंडळाकडून गाभा-यांचं नव्याने बांधकाम करण्याची मागणी 

14 Feb 2025, 10:06 वाजता

अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडल्यानंतर महसूल विभागाच्या पथकावर हल्ला करण्यात आलाय

- वाळूतस्करांनी दगडांनी तुफान हल्ला केलाय
- संभाजी नगरच्या सिल्लोड मध्ये ही घटना घडली. 
- अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं शासकीय वाहन डिझेल टाकून जाळण्याचाही प्रयत्न केला.
- चालकाने तात्काळ वाहन पळविल्याने त्यांचा जीव वाचला.  ही धक्कादायक घटना दीडगाव ते उपळी रस्त्यावर घडली
- याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी ४ वाळूतस्करांविरुद्ध याबाबत गुन्हा दाखल केला.

 

14 Feb 2025, 10:05 वाजता

ममता कुलकर्णीचा यूटर्न... 

किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वराच्या पदाचा राजीनामा ममता कुलकर्णीनं मागे घेतला.  निर्णयाबाबत नवा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. गुरूंनी राजीनामा मंजूर केला नसल्याची दिली माहिती. 

 

14 Feb 2025, 10:01 वाजता

पुण्याच्या देहूरोडमध्ये जुन्या वादातून वाढदिवसाच्या कार्यक्रमात गोळीबार

पुण्याच्या देहूरोडमध्ये जुन्या वादातून वाढदिवसाच्या कार्यक्रमात गोळीबार. घटनेत एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू...

 

14 Feb 2025, 10:01 वाजता

पीकविमा योजनेत फेररचना होण्याची शक्यता

पीकविमा योजनेत फेररचना होण्याची शक्यता. एक रुपयाऐवजी 100 रुपये आकारण्याचा कृषी विभागाचा प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती.

 

14 Feb 2025, 10:00 वाजता

सुदर्शन घुलेला आज केज न्यायालयात हजर 

बीड खंडणी प्रकरणी आज सुदर्शन घुलेंची पोलीस कोठडी संपणार आहे.. त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे.. तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे 65 दिवस झाले तरीरी फरारच आहे.. 

 

14 Feb 2025, 09:58 वाजता

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर

देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे.. या दौऱ्यात फडणवीस अमित शाहांसोबत चर्चा करणार आहे.. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा झाला होता त्यामुळे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याला महत्तव आहे..