Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरात काय काय झालं.. महत्त्वाच्या घडामोडी काय आहे. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
14 Feb 2025, 19:44 वाजता
धस –मुंडे भेटीनंतर मनोज जरांगे आक्रमक
आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे आक्रमक झालेत. सुरेश धसांनी मोठा धोका दिलाय. देवेंद्र फडणवीसांनीदेखील असा धोका दिला नाही, अशा शब्दांत मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केलाय. सुरेश धसांनी गुंडांची टोळी चालवणा-यांची भेट घेणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, असंही जरांगे म्हणालेत. तर सुरेश धस बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहेत, अशी टीका सुषमा आंधारे यांनी केलीय.
14 Feb 2025, 19:43 वाजता
धनंजय मुंडे यांच्या प्रकृती संदर्भात विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आमने सामने आलेले सुरेश धस आणि धनंजय मुंडें यांच्यात भेट झालीये. धनंजय मुंडे यांच्या प्रकृती संदर्भात विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचं सुरेश धस यांनी स्पष्ट केलय. धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतल्याचं धस यांनी सांगितलंय.
14 Feb 2025, 19:42 वाजता
धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीचं अभय
अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसतोय.. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र धनंजय मुंडे यांना अभय दिल्याचं पाहायला मिळतंय.. दोषी नाही तर कारवाई होणार नसल्याची ठाम भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती राष्ट्रवादीने दिलीय.
14 Feb 2025, 17:26 वाजता
देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनंतर आता एकनाथ शिंदेंचीही वॉर रुम
महायुती सरकारमध्ये वॉररुमवरुन कोल्ड वॉर सुरु झालीये की काय अशी स्थिती आहे. राज्यातील प्रकल्पांचा विकास कामांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस आणि अजितदादांनी वॉर रुम सुरु केल्यात. दोघांनी वॉर रुम सुरु केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही वॉर रुमही सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. या वॉर रुमच्या माध्यमातून शिंदेंही प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. प्रकल्पांना गती मिळावी विकासकामं लवकरात लवकर व्हावीत असा या वॉर रुमचा उद्देश असल्याचं सांगण्यात येतंय.
14 Feb 2025, 17:26 वाजता
'पालकमंत्रिपदासाठी तुळजाभवानीला साकडं घालणार'
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्यापही कायम आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्री आग्रही आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी तुळजाभवानीला साकडं घालणार असल्याचं विधान रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावलेंनी केलंय. तर लवकरच पालकमंत्रिपदाबाबत निर्णय होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
14 Feb 2025, 15:58 वाजता
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही - उदय सामंत
सूर्य चंद्र असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय. विरोधकांकडून योजना बंद होणार असल्याचा महिलांमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम सुरु असल्याचं ही त्यांनी म्हटलंय..
14 Feb 2025, 15:54 वाजता
क्रिकेटमध्येही घेता येणार पदवीचं शिक्षण...
आता क्रिकेटमध्येही घेता येणार पदवीचं शिक्षण ...एमसीए मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने सुरु करणार पदवी अभ्यासक्रम...
14 Feb 2025, 14:37 वाजता
19, 20 फेब्रुवारीला दिल्लीत मंत्रिमंडळाचा शपथविधी ?
19, 20 फेब्रुवारीला दिल्लीत मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडू शकतो. 17,18 फेब्रुवारी रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री दिल्लीत दाखल होताच दिल्लीत सरकार स्थापनेच्या प्रयत्नांना वेग येईल. पंतप्रधान मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा आणि भाजपच्या इतर प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. पंतप्रधान परतल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाईल.
दिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने गृहपाठ केला आहे. गृहपाठाच्या आधारे पंतप्रधानांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. 48 पैकी 15 आमदारांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. त्यापैकी 9 नावांची निवड करून मुख्यमंत्री, मंत्री आणि सभापती यांची नावे निश्चित केली जाणार आहेत.
14 Feb 2025, 14:08 वाजता
'घरगडी'वरून दोन्ही शिवसेनेत जुंपली
-- 'बाळासाहेबांनंतर पक्षात घरगड्यासारखी वागणूक मिळाली'
-- एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
-- एकनाथ शिंदेंच्या आरोपाला संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय
-- घरगडी असते तर नगरविकास खातं तुम्हाला दिलं असतं का?
-- संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंचा सवाल
14 Feb 2025, 13:39 वाजता
हाजी अली ते मरिन ड्राइव्ह मार्गिका खुली झाल्यानं मुंबईकरांना दिलासा
कोस्टल रोडच्या हाजी अली जंक्शनच्या 8 पैकी 7 आंतरबदल मार्गिका आतापर्यंत सुरु झाल्यात. त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका झालीय. मुंबई सागरी किनारा मार्गावर अनेक ठिकाणी आंतर बदल मार्गिका देण्यात आल्यात.