Maharashtra Breaking News LIVE Updates: धस-मुंडे भेटीनं वादंग; कोणी मध्यस्थी केली नाही - धस

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर...

Diksha Patil | Feb 14, 2025, 19:44 PM IST
Maharashtra Breaking News LIVE Updates: धस-मुंडे भेटीनं वादंग; कोणी मध्यस्थी केली नाही - धस

Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरात काय काय झालं.. महत्त्वाच्या घडामोडी काय आहे. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर 

14 Feb 2025, 13:38 वाजता

पश्चिम रेल्वेवर येत्या रविवारी ब्लॉक 

पश्चिम रेल्वेवर येत्या रविवारी विरार-वैतरणा आणि सफाळे-केळवे रोडदरम्यान पीएससी स्लॅब आणि गर्डर टाकण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येतोय. याचा दोन्ही मार्गिकांवरील वाहतुकीवर परिणाम होणारेय. या ब्लॉकमुळे 8 लोकल आणि पॅसेंजर गाड्या पूर्णपणे रद्द केल्या जाणारेय.

14 Feb 2025, 13:36 वाजता

भाडेवाढीनंतर एसटीच्या उत्पन्नात 13 टक्क्यांची वाढ

पहिल्याच पंधरवाड्यात 51 कोटींचं उत्पन्न एसटीला मिळालंय. 25 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत 388 कोटी 19 लाख इतंक उत्पन्न मिळालंय.

14 Feb 2025, 13:01 वाजता

​कल्याणमधील माजी आमदार गणपत गायकवाड यांचा जमीन अर्ज फेटाळला

कल्याणमधील माजी आमदार गणपत गायकवाड याचा जमीन अर्ज कल्याण न्यायालयाने फेटाळलाय..गेल्या वर्षी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडवर 6 गोळ्या झाडल्या होत्या..या प्रकरणी त्यांनी अटकेनंतर 1 वर्षाने जामिनासाठी अर्ज केला होता..

14 Feb 2025, 12:59 वाजता

शरद पवारांबाबतच्या वक्तव्याबाबत संजय राऊतांचं स्पष्टीकरण

शिवसेना UBT चे खासदार संजय राऊतांनी शरद पवारांबाबतच्या वक्तव्याबाबत आज स्पष्टीकरण दिलं आहे. आम्हाला पवारांविषयी नाराजी असण्याचं कारण काय? आम्ही पवारांवर टीका केलेली नाही तर एका विशिष्ट घटनेबाबत भूमिका मांडली, असं राऊतांनी म्हटलं आहे. ज्यांनी सरकार पाडलं, त्यांचा सत्कार पवारांनी करणं हा त्यांचा स्वत:चा अपमान आहे, असं राऊतांनी म्हटलं. दरम्यान यावेळी त्यांनी महायुतीवरही निशाणा साधला. सरकार भ्रष्टाचारी आहे. पैशांच्या बळावर निवडणुका जिंकल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  

14 Feb 2025, 12:58 वाजता

​मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला RBIचा दणका

मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला RBIचा दणका. बँकेच्या व्यवहारावर रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध. बँकेतून पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या रांगा. 

14 Feb 2025, 12:14 वाजता

​मुंबईत रेल्वे फाटकामुळे लोकलच्या वेळापत्रकाला फटका 

मुंबईत रेल्वे फाटकामुळे लोकलच्या वेळापत्रकाला फटका बसतोय. चालू आर्थिक वर्षात जानेवारी 2025 पर्यंत मध्य रेल्वेवर रेल्वे फाटकामुळे जवळपास अडीच हजार वेळा लोकलचं वेळापत्रक कोलमडलंय. जादा वेळ खुले राहिलेल्या रेल्वे फाटकाचा त्रास प्रवाशांना होतोय.

14 Feb 2025, 12:13 वाजता

​कोल्हापूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर 

कोल्हापूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा साचलाय. यासाठी महानगरपालिकेने टिप्पची यंत्रणा उभारलीय. मात्र तरीही कचरा वेळेवर आणि सर्वच ठिकाणचा उचलला जात नसल्याचं शहरात फेरफटका मारल्यानंतर दिसून येतंय. 

14 Feb 2025, 12:11 वाजता

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि मुख्य वनसंरक्षक पदावर अनिता पाटील यांची नियुक्ती

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि मुख्य वनसंरक्षक पदावर अनिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आलीय. पहिल्यांदाच वन सेवेतील महिला अधिकाऱ्याची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे.

14 Feb 2025, 12:10 वाजता

संजय राऊत राजापूरचा दौरा करणार

साळवींच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची पडझड थांबवण्यासाठी संजय राऊत राजापूरचा दौरा करणारेत..संघटनात्मक ताकद मतदारसंघात टिकून ठेवण्यासाठी राऊत हा दौरा करणार असल्याची माहिती आहे...
 

14 Feb 2025, 12:08 वाजता

​मनोज जरांगेंनी साखळी उपोषण पुढे ढकललं.

मनोज जरांगेंनी उद्यापासून सुरू होणारं साखळी उपोषण पुढे ढकललं. लवकरच पुढील तारीख जाहीर करणार असल्याची जरांगेंची माहिती..