21 Feb 2025, 11:35 वाजता
मुंबईतील कोस्टल रोडला वर्षभरातच तडे?
Coastal Road :मुंबई महापालिकेचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामावर प्रश्न निर्माण होतील असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोस्टल रोडला तडे गेले असून त्यावर पॅचवर्क करण्यात आला आहे. ठिकठिकाणी कोस्टल रोडला तडे गेले असून यावर क्रोंकीटचे पॅच पाहायला मिळत आहे. मुंबई कोस्टल रोडच्या हाजी अलीजवळील उत्तरेकडील भागावर पॅचवर्क हायलाइट करण्यात आलेत आहेत. या आधी देखील असे कोस्टल रोडच्या मार्गावर तडे गेल्याचे निदर्शनास आले होते.
21 Feb 2025, 10:33 वाजता
महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारीचा धोका वाढला
Cyber Fraud : महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे.... सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार 2024मध्ये सुमारे 2 लाख 4 हजार तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.... राज्यात मुंबई, ठाणे आणि पुणे ही सायबर गुन्हेगारांची सर्वाधिक 'सॉफ्ट टार्गेट' ठरलेली शहरे आहेत... राज्यात सवर्वाधिक तक्रारीमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. सन २०२४मध्ये मुंबईमध्ये सायबर फसवणुकीच्या ५४ हजार ८३६ तक्रारी करण्यात आल्या. पुण्यामध्ये २६ हजार ३३२, तर ठाण्याचा तिसरा क्रमांक लागत असून, ठाण्यात २३ हजार १४८ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Feb 2025, 09:54 वाजता
टोमॅटोच्या दरात मोठी घसरण
Tomato Rate : रब्बी हंगामात टोमॅटोची सरासरीपेक्षा जास्त लागवड झाली... हिवाळ्यातील अनुकूल हवामानामुळे टोमॅटोच्या उत्पादनात वाढ झाली. दिल्ली आणि कोलकाता या देशातील मोठ्या बाजारांतून मागणी घटल्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोला प्रति किलो पाच ते आठ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे... राज्यात रब्बी हंगामात ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त लागवडी झाल्या. जानेवारीअखेर राज्यात १३ हजार ५९५ हेक्टरवर टोमॅटो लागवड करण्यात आली आहे. पुण्यात सर्वाधिक ४,८११ आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ४,०४७ हेक्टरवर लागवड झाली आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Feb 2025, 09:17 वाजता
क्लीन अप मार्शल कंत्राटदार कंपन्या रडारवर
BMC Clean Up Marshal : मुंबई शहर आणि उपनगरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्याप्रकरणी गेल्या 11 महिन्यांत एक लाख 40 हजार नागरिकांकडून क्लीन अप मार्शलनी चार कोटी 54 लाखांचा दंड वसूल केला आहे...मात्र, दुसरीकडे मार्शल पुरवणाऱ्या संस्थाही पालिकेच्या रडारवर आल्या आहेत... प्रत्येक वॉर्डात प्रत्येकी 30 क्लीन अप मार्शलची नियुक्ती करणे आवश्यक असताना काही ठिकाणी त्यापेक्षा कमी संख्येने मार्शल कार्यरत असल्याचे निदर्शनास येत आहे... त्यामुळे संबंधित संस्थांकडून एकूण 60 लाख रुपयांचा दंड वसूल करावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिले आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Feb 2025, 08:44 वाजता
मुंबईत फळांमधून गांजाची तस्करी
Mumbai Ganja Seized : मुंबईत फळांमध्ये गांजाची तस्करी होत असल्याचं समोर आलंय.. बँकॉकहून मुंबईत आलेल्या 5 जणांना सीमा शुल्कविभागानं मुंबई विमानतळावर अटक केलीये. त्यांच्याकडून 56 कोटी 26 लाखांचा गांजा जप्त करण्यात आलाय... हे पाचही आरोपी गुजरातच्या पोरबंदरचे रहिवासी आहेत. फळ आणि फुलांनी भरलेल्या पाच मोठ्या पिशव्यांमध्ये त्यांनी हा गांजा लपविला होता आणि या पिशव्या त्यांनी त्यांच्याकडील ट्रॉली बॅगेत ठेवल्या होत्या. तस्करीसाठी कमिशन मिळणार असल्यामुळे तस्करी केल्याची कबुली त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Feb 2025, 08:33 वाजता
परेदशातून MBBSसाठी NEET UG सक्तीची
MBBS Student : भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्याही परदेशी संस्थेतून MBBS करण्यासाठी NEET UG परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. NEET परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय तो विद्यार्थी परदेशी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार नाही. एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचा नियम सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलाय..नियमांमध्ये ढवळाढवळ करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही असं कोर्टानं म्हटलंय. सुनावणीदरम्यान खंडपीठाने स्पष्टपणे सांगितले की, सुधारित नियमांच्या अंमलबजावणीनंतर जर एखाद्या उमेदवाराला प्राथमिक वैद्यकीय पात्रता प्राप्त करण्यासाठी परदेशी संस्थेत प्रवेश घ्यायचा असेल, तर तो देशांतर्गत वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेच्या नियमांतून सूट मागू शकत नाहीत. यामुळे भारताबाहेर कुठेही सराव करण्याच्या त्यांच्या अधिकारावर मर्यादा येत नाही.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Feb 2025, 08:18 वाजता
राज्यातील जिल्हा बँक कर्जमाफी फेऱ्यात
District Bank : राज्यातील पीककर्जाची थकबाकी डिसेंबरअखेर 28 हजार 606 कोटींवर पोहोचलीय...निवडणूक प्रचारातील कर्जमाफीच्या घोषणामुळे वसुलीचाही पेच निर्माण झालाय त्यामुळे जिल्हा बँका अडचणीत सापडल्या असून नवीन हंगामा पीक कर्ज देणं अवघड होण्याची शक्यता..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Feb 2025, 07:59 वाजता
'गुगल पे'चा वापरकर्त्यांना दणका
Google Pay : 'गुगल पे'चा वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे... कारण आता तुम्ही भरत असलेल्या ऑनलाईल बिलासाठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागणार आहेत...गुगल पेने सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केलीय... UPI प्लॅटफॉर्म गुगल पे कडून या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही...
21 Feb 2025, 07:57 वाजता
सोनिया गांधींची प्रकृती खालावली
Delhi Soniya Gandhi : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर दिल्लीच्या गंगा राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत....दरम्यान सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.. पोटासंबंधीच्या कारणामुळे त्यांना गुरुवारी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Feb 2025, 07:55 वाजता
माणिकराव कोकाटेंची आमदारकी अडचणीत
Manikrao Kokate : बनावट कागदपत्राद्वारे शासकीय कोट्यातून सदनिका मिळवल्याप्रकरणी नाशिक जिल्हा कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने माणिकराव कोकाटेंची आमदारकी अडचणीत आलीय... लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास सदस्यत्व रद्द होत असते... त्यामुळे आता अपात्रतेबाबत विधिमंडळ सचिवालयाच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -