21 Feb 2025, 19:20 वाजता
'झी २४ तास'चा इम्पॅक्ट, विकिपीडियाच्या लेखकांवर बदनामीचा गुन्हा
Defamation case on Wikipedia : विकिपीडियावर वादग्रस्त लिखाण करणाऱ्या लेखकांवर अखेर बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीराजेंच्या बदनामीप्रकरणी विकिपीडियावरच्या लेखकांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. झी २४ तासनं ही बातमी सर्वात आधी दाखवली होती. झी २४ तासच्या मोहिमेला यामुळे मोठं यश आलं आहे. झी २४ तासच्या मोहिमेमुळे लेखकांवर गुन्हा दाखल झाला आहे. दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात नोंदवण्यात आला आहे. निखिल भामरे यांच्या तक्रारीवरुन सायबर सेलनं गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे विकिपीडियाला हा कंटेंट हटवण्यासाठी 3 दिवसांचा वेळ देण्यात आला होता. मात्र विकिपीडियाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर संबंधित लेखकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Feb 2025, 16:26 वाजता
राज ठाकरेंनी घेतली मनपा आयुक्त भूषण गगराणींची भेट
Raj Thackeray meet Municipal Commissioner : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या बाजूनं मैदानात उतरले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी इतर राज्यांमधून मोठ्या संख्येनं रुग्ण येतात. या रुग्णांचा BMCच्या हॉस्पिटल्सवर खूप मोठा भार पडत असल्याचा मुद्दा घेऊन राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये परराज्यांमधून येणा-या पेशंटसाठी वेगळं शुल्क आकारता येईल का यावर चर्चा झाल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज ठाकरेंचा हा मुद्दा नक्कीच चर्चेत राहणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Feb 2025, 16:01 वाजता
जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला नाही - जिल्हाधिकारी पांचाळ
Collector on Jalana Paper Leak : दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालाय.. जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटल्याची चर्चा सुरु आहे... पेपर सुरु झाल्यानंतर 15 मिनिटातच शहरातील झेरॉक्स सेंटर मधून उत्तरपत्रिकांची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आल्या.. जालन्यातील बदनापूर शहरात हा धक्कायादक प्रकार उघडकीस आलाय.
मात्र, मराठीचा पेपर फुटला नसल्याचं म्हणत प्रश्नपत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Feb 2025, 15:48 वाजता
येवल्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा
Yeola copy-free campaign : जालन्यासोबतच येवल्यातही कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे.. दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी येवल्यातील काही परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवण्यासाठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय.. अनेक केंद्रांवर बाहेरून कॉपी पुरवण्यासाठी टवाळखोरांनी गर्दी केली होती.. कॉपी पुरवण्यासाठी विरोध करणा-या शिक्षकांना देखील टवाळखोर दमदाटी करत असल्याचे काही शिक्षकांनी सांगितलं... दरम्यान यावेळी झी 24 तासचा कॅमेरा बघताच टवळखोरांची एकच पळापळ झाली.
21 Feb 2025, 14:27 वाजता
जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला
Jalana Marathi Paper Leak : दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालाय.. जालन्यात दहावीचा माराठीचा पेपर फुटलाय.. पेपर सुरु झाल्यांतर 15 मिनिटातच शहरातील झेरॉक्स सेंटर मधून उत्तरपत्रिकांची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आल्या.. जालन्यातील बदनापूर शहरात हा धक्कायादक प्रकार उघडकीस आलाय. शासनाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती मात्र पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त परीक्षेचा फज्जा उडताना जालन्यात पाहायला मिळाला..
21 Feb 2025, 14:13 वाजता
आमदार श्वेता महालेंना जीवे मारण्याची धमकी
Shweta Mahale : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकीचं प्रकरण ताजं असताना आता भाजपच्या महिला आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये.. अज्ञाताकडून श्वेता महालेंना पत्र पाठवत जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये.. श्वेता महाले या भाजपच्या चिखली मतदारसंघाच्या आमदार आहेत.. धमकी प्रकरणी पोलिसात तक्रार करणार असल्याची माहिती महालेंनी दिलीये..
21 Feb 2025, 13:01 वाजता
धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या - संजय राऊत
Supriya Sule, Sanjay Raut On Dhananjay Munde & Manikrao Kokate : धनंजय मुंडेंचा आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी संजय राऊतांनी केलाय. भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे दिल्यानंतरही राजीनामा घेतला जात नसल्याचं संजय राऊत म्हणालेत.. त्यामुळे अजित पवारांच्या निर्णयाची वाट न पाहता मुख्यमंत्र्यांनी दोघांचा राजीनामा घ्यावा असं राऊत म्हणालेत.. तर सुप्रिया सुळेंनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीय..
21 Feb 2025, 12:57 वाजता
बंदुकीसाठी केलेल्या अर्जावरुन कोकाटे अडचणीत
Manikrao Kokate : बंदुकीच्या परवान्यामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या बनावट कागदपत्रांच बिंग फुटलंय... 1994मध्ये माणिकराव कोकाटेंनी बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता.. 40 ते 50 कामगारांना प्रत्येक आठवड्याला 9 हजार रुपये रोख पगार द्यावा लागतो.. ही रोख रक्कम हाताळण्यासाठी बंदुकीच्या परवान्याची मागणी त्यांनी संबंधीत यंत्रणेकडे केली होती.. तर दुसरीकडे शासकीय कोट्यातून घर घेताना त्यांनी स्वताचं उत्पन्न कमी दाखवलं होतं.. त्यामुळे कोकाटेंनी सादर केलेली कागदपत्र आणि माहिती खोटी असल्याचं चौकशीत उघड झालंय.... त्यामुळेच कोर्टानं माणिकराव कोकाटेंना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावली..
21 Feb 2025, 12:40 वाजता
माजी मंत्री अब्दुल सत्तार अडचणीत?
Abdul Sattar : माजी मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत आले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर झाल्याचं भासवून सत्तारांनी शासकीय अनुदान लाटलं, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेंतर्गत, 2015 पासून 2 लाख रुपये वार्षिक अनुदान दिलं जात होतं. 4 ऑक्टोबर 2024 च्या बैठकीत अनुदान वाढीबाबत कोणताही प्रस्ताव नव्हता, तरीही तो प्रस्ताव मंजूर झाल्याचं सत्तारांनी भासवलं आणि अनुदान 10 लाख रुपयांपर्यंत वाढवलं. अब्दुल सत्तारांशी संबंधित 16 शाळांना वाढीव अनुदान मंजूरही झालं, असा संशय कुंभारांनी व्यक्त केला आहे. अवघ्या 6 दिवसांत प्रक्रिया पूर्ण झाली. या बेकायदेशीर प्रक्रियेला जबाबदार अधिका-यांवर कारवाई करावी, अशी मागणी कुंभार यांनी केली आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Feb 2025, 12:31 वाजता
होळीनिमित्त कोकणासाठी विशेष रेल्वेगाड्या
Holi Special Train : होळीनिमित्त कोकणवासीय आपल्या मूळगावी जाण्याच्या तयारीत असून रेल्वे तिकीट आरक्षित करण्यासाठी लगबग सुरू आहे... कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन मध्य व कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे. ..होळीनिमित्त मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने सीएसएमटी – मडगाव आणि एलटीटी – मडगाव अशा रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -