21 Feb 2025, 07:53 वाजता
राजधानी दिल्लीत साहित्यिकांचा मेळा
Delhi Sahitya Samelan : दिल्लीत आज साहित्यिकांचा मेळा भरणार आहे.. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज दिल्लीत सुरुवात होणार आहे.. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. साहित्य संमेलनासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय.. आजपासून पुढील तीन दिवस साहित्य संमेलन सुरू राहणार आहे. सकाळी 9.30 ते 11 वाजेपर्यंत ग्रंथदिंडी आणि ध्वजारोहण होणार आहे.. तसेच संसदेतून ग्रंथदिंडी निघण्याची शक्यता आहे.. दुपारी 3.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विज्ञान भवनात साहित्य संमेलनाचं उदघाटन होणार आहे.. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे असतील. त्यामुळे राजकारणातील सर्व दिग्गज अ. भा. साहित्य संमेलनाच्या मंचावर एकत्र दिसणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -