Maharashtra Breaking News LIVE: भाजपा आमदार सुरेश धस उद्या घेणार देशमुख कुटुंबाची भेट

राज्यातील सर्व घडामोडींची वेगवान आढावा. 

Maharashtra Breaking News LIVE: भाजपा आमदार सुरेश धस उद्या घेणार देशमुख कुटुंबाची भेट

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींसह इतर क्षेत्रातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर जाणून घ्या

 

21 Feb 2025, 12:55 वाजता

महायुतीला साधू-संत आणि संघामुळे मिळालं यश - नरेंद्र महाराज 

--विधानसभेत महायुतीला साधू-संत आणि संघामुळे यश मिळालं असा दावा नरेंद्र महाराज यांनी केला आहे. 'लाडक्या बहिणीमुळे नाही तर साधू-संतामुळे यश' मिळाल्याच नरेंद्र महाराज यांनी म्हटलं आहे. महायुतीला विधानसभेत साधू-संतामुळे यश आल्याच ते म्हणाले आहेत. अजित दादांना पण याची खात्री नव्हती की माझ्या 10 ते 12 पेक्षा जात जागा येतील ते चित्र बदललं, असं ही यावेळी ते म्हणाले. शिंदे साहेबांना वाटतंय लाडक्या बहिणीमुळे यश मिळाल पण निवडणुकीत साधू- संताच्या योगदानामुळे यश मिळाल्याचा दावा नरेंद्र महाराज यांनी केला आहे.  

21 Feb 2025, 12:08 वाजता

मुंबई नाशिक माहामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुंबईच्या दिशेनं येणा-या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.. मुख्य मार्गासह सर्व्हिस रोडवरही वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे अवघं तीन मिनटांचं अंतर कापण्यासाठी पाऊण तास लागत आहे.  या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. रोज होणा-या या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

21 Feb 2025, 11:29 वाजता

माजी मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत?

​माजी मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत आले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर झाल्याचं भासवून सत्तारांनी शासकीय अनुदान लाटलं, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. 
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेंतर्गत, 2015 पासून 2 लाख रुपये वार्षिक अनुदान दिलं जात होतं. 4 ऑक्टोबर 2024 च्या बैठकीत अनुदान वाढीबाबत कोणताही प्रस्ताव नव्हता. तरीही तो प्रस्ताव मंजूर झाल्याचं सत्तारांनी भासवलं आणि अनुदान 10 लाख रुपयांपर्यंत वाढवलं. अब्दुल सत्तारांशी संबंधित 16 शाळांना वाढीव अनुदान मंजूरही झालं, असा संशय कुंभारांनी व्यक्त केला आहे. अवघ्या 6 दिवसांत प्रक्रिया पूर्ण झाली. या बेकायदेशीर प्रक्रियेला जबाबदार अधिका-यांवर कारवाई करावी, अशी मागणी कुंभार यांनी केली आहे.

21 Feb 2025, 10:59 वाजता

सरकारकडून लाडक्या बहिणींच्या योजनेला कात्री? नियमांत बदल

--सरकारनं लाडक्या बहिणींच्या योजनेला कात्री लावण्यात आलीय
--लाडक्या बहिणीच्या पात्रतेसाठी नियम लावण्यात आलेत
त्यामुळे आतापर्यंत 12 लाख बहिणी अपात्र ठरल्यात
--छाननीनंतर जवळपास 40 लाखांपर्यंत लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे
तशी माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिलीय
-- लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यानं सरकारची वर्षाला  दोन हजार 160 कोटींची बचत होणार असल्याची माहिती आहे.
दुहेरी योजनांचा लाभ,वाहन नावावर असणे,उत्पन्न जास्त असणे ...असे विविध निकष वापरून अपात्र केले जात आहे

21 Feb 2025, 10:35 वाजता

भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्याही परदेशी संस्थेतून MBBS करण्यासाठी नीट UG परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. NEET परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय तो विद्यार्थी परदेशी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार नाही. एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 

21 Feb 2025, 10:29 वाजता

उपमुख्यमंत्र्यांना धमकी देणारे 2 आरोपी अटक 

--उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकीचा ईमेल करणाऱ्या दोघांना अटक
-- मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बुलढाण्यातून 2 आरोपी अटक
--मंगेश वायाळ आणि अभय शिंगणं यांना अटक करण्यात आली आहे.
-- अटक करण्यात आलेले दोघेही आरोपी बुलढाण्याच्या देऊळगावचे रहिवासी…

21 Feb 2025, 10:28 वाजता

आरोपी कृष्णा आंधळे 72 दिवसांपासून फरार 

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.देशमुखांच्या हत्येला 72 दिवस पूर्ण झालेत.. मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडलेला नाही.. त्याचा शोध पोलीस, सीआयडीची पथकं घेताहेत. बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय..आंधळेची माहिती देणा-याला बक्षीस मिळेल, असंही पोलिसांनी जाहीर केलंय. मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्याप लागला नाहीये..  

21 Feb 2025, 10:27 वाजता

राज ठाकरे मुंबई पालिका आयुक्तांची घेणार भेट

--मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणींची घेणार भेट
--दुपारी 2 वाजता राज ठाकरे मुंबई पालिकेत

21 Feb 2025, 10:24 वाजता

--मुंबई काँग्रेसमध्ये बदलाचे वारे?

--मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा सुरू आहे
--वर्षा गायकवाड सध्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत
--मात्र त्यांच्याविरोधात काँग्रेसमधील अंतर्गत गट कार्यरत असल्याची चर्चा आहे
--मुंबई काँग्रेस संघटनेत सध्या वर्षा गायकवाड विरुद्ध इतर सर्व काँग्रेस नेते असे शीतयुद्ध सुरू आहे. विधानसभेत मुंबईत समन्वयाचा अभाव असल्यामुळे केवळ तीन जागा काँग्रेसला जिंकता आल्यात.. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये बदलाचे वारे सुरू आहेत. 

21 Feb 2025, 09:11 वाजता

मुंबईत बनावट नोटांचा छापखाना आढळला आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. बनावट नोटांसह प्रिंटर जप्त करण्यात आला आहे.