Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींसह इतर क्षेत्रातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर जाणून घ्या
21 Feb 2025, 07:47 वाजता
सोलापूर बाजार समिती निवडणुकींची सुनावणी
सोलापूर बाजार समिती निवडणुकींच्या सुनावणीला 25 फेब्रुवारीचा मुहूर्त निघाला आहे. उच्च न्यायालयात 25 फेब्रुवारीला ही सुनावणी होणार आहे. संचालक मंडळाला 2 वर्षे मुदतवाढ देण्यात आली होती. आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बाजार समिती पुढील कारवाई करणार आहे.
21 Feb 2025, 07:44 वाजता
रेशनकार्ड धारकांना ई केवायसी बंधनकारक
राज्याच्या अन्न पुरवठा विभागाने प्रत्येक रेशनकार्ड धारकास ई-केवायसी बंधनकारक केलय. ई-केवायसी न केल्यास लाभार्थ्यांचा धान्य पुरवठा बंद केला जाणार आहे. नाशिक जिल्हयात 11 लाख 50 हजार लाभार्थ्यांचे ई-केवायसी झाले नसून हे लाभार्थी धान्य योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात.
- ‹ previous
- 1
- 2
- 3
- 4