Maharashtra Breaking News LIVE: भाजपा आमदार सुरेश धस उद्या घेणार देशमुख कुटुंबाची भेट

राज्यातील सर्व घडामोडींची वेगवान आढावा. 

Maharashtra Breaking News LIVE: भाजपा आमदार सुरेश धस उद्या घेणार देशमुख कुटुंबाची भेट

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींसह इतर क्षेत्रातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर जाणून घ्या

 

21 Feb 2025, 20:12 वाजता

बीड - भाजपा आमदार सुरेश धस उद्या घेणार देशमुख कुटुंबाची भेट 

आज मनोज जरांगे पाटील यांनी देशमुख कुटुंब आणि मसाजोग ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस उद्या भेट घेणार आहेत 

25 तारखेला ग्रामस्थांच्या वतीने अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे, याच पार्श्वभूमीवर सुरेश धस यांची ही भेट होणार आहे 

धस आणि मुंडे यांच्या भेटीनंतर सुरेश धस पहिल्यांदाच मसाजोग गावात जाणार आहेत

21 Feb 2025, 18:44 वाजता

उल्हासनगर महापालिकेची अभय योजना जाहीर  

मालमत्ता कर भरण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने अंतिम अभय योजना जाहीर केली असून, २४ फेब्रुवारी पासून १८ मार्चपर्यंत कर भरणाऱ्या नागरिकांना मोठी सूट मिळणार आहे. मात्र, ६ मार्च पूर्वी कराचा पूर्ण भरणा करणाऱ्या नागरिकांना १००% व्याज आणि दंड माफीचा लाभ मिळेल. या नंतर सवलत टप्प्याटप्प्याने कमी केली जाणार आहे. ही अंतिम संधी असून यानंतर अशी कोणतीही योजना लागू केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिला आहे

21 Feb 2025, 18:07 वाजता

संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण टाकणाऱ्या लेखकांवर गुन्हा दाखल

विकिपीडियावर संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण टाकणाऱ्या लेखकांवर गुन्हा दाखल

समाजात तेढ निर्माण होईल असे लिखाण विकिपीडियावर अपलोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

विकिपीडियाला हा कंटेंट हटवण्यासाठी तीन दिवसांचा वेळ देण्यात आला होता, मात्र विकिपीडियाकडून कोणताही प्रतिसाद नाही

महाराष्ट्र सायबर सेल विकिपीडियावर असलेलेल्या कंटेंटसंदर्भात गुन्हा दाखल

विकिपीडियावर संभाजी महाराजाबद्दल वादग्रस्त लिखाण करणारे अडचणीत येणार

21 Feb 2025, 16:59 वाजता

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं PM नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. शरद पवारही यावेळी उपस्थित आहेत. 

21 Feb 2025, 16:46 वाजता

मुंबई पोलिसांचे ऑपरेशन बांगलादेशी

मुंबई पोलीस बेकायदेशीर बांगलादेशींविरुद्ध कारवाई करत आहेत. या मोहिमेअंतर्गत 20 फेब्रुवारी 2025 रोजी एकाच दिवसात मुंबई पोलिसांनी एकूण 27 बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली. या वर्षी आतापर्यंत फक्त 53 दिवसांत मुंबई पोलिसांनी एकूण 353 बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली आहे. 

21 Feb 2025, 16:08 वाजता

मुंबईला पराभवाचा धक्का देत विदर्भाच्या संघाची रणजीच्या फायनलमध्ये धडक

णजी ट्रॉफीच्या सेमिफाईनलमध्ये विदर्भाच्या संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केलीय . गत विजेता मुंबईचा 80 धावांची पराभव करत गेल्यावर्षीच्या फायनलमध्ये पराभवाचा वचपा  विदर्भाच्या संघाने काढला आहे. 

अजिंक्य रहाणे, सुर्यकुमार यादव,शार्दूल ठाकूर सारख्या अनुभवी खेळाडूंनी सजलेला मुंबईचा संघ विदर्भाच्या युवा बॉलिंग अटॅक पुढे फारसा टिकाव धरू शकला नाही. 

विदर्भ विरुद्ध केरळ यांच्यात रणजी फायनलचा मुकाबला खेळला जाणार फायनल सामना

2017-18,2018-19  सलग दोनदा रणजी ट्रॉफी अजिंक्यपद विदर्भाने पटकावल आहे तर गेल्या सिजनमध्ये विदर्भचा फायनलमध्ये मुंबई संघाने पराभव केला होता. 

21 Feb 2025, 15:02 वाजता

यवतमाळमध्येही पेपर फुटला

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे पहिल्याच दिवशी दहावीचा पेपर फुटला! 

पेपरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय महागाव आणि कोठारी येथील शाळेत  चौकशी सुरू 

21 Feb 2025, 14:13 वाजता

पालकमंत्रिपदाचा तिढा अमित शाहांच्या कोर्टात- सूत्र 

रायगड, नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अमित शाहांच्या दरबारी पोहोचला असून ते त्यावर तोडगा काढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अमित शाह महायुतीच्या तिन्ही नेत्यांसोबत चर्चा करून त्याबाबत निर्णय घेणार असल्याचं कळत आहे. उद्या केंद्रीय मंत्री अमित शाह पुणे दौ-यावर आहेत यावेळी पालकमंत्रिपदाबाबत चर्चा होऊ शकते अशी माहिती आहे.

21 Feb 2025, 14:11 वाजता

जालना आणि येवल्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला

जालन्यासोबतच येवल्यातही कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी येवल्यातील काही परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवण्यासाठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनेक केंद्रांवर बाहेरून कॉपी पुरवण्यासाठी टवाळखोरांनी गर्दी केली होती.. कॉपी पुरवण्यासाठी विरोध करणा-या शिक्षकांना देखील टवाळखोर दमदाटी करत असल्याचे काही शिक्षकांनी सांगितलं. दरम्यान यावेळी झी 24 तासचा कॅमेरा बघताच टवळखोरांची एकच पळापळ झाली.

21 Feb 2025, 12:58 वाजता

सुरेश धस यांचे धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप 

भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मुंडेंनी कृषी साहित्य खरेदी करताना मूळ बाबी बदलल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.  नॅनो युरियामध्ये 21 कोटी 26 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्याच बरोबर  DAPमध्ये 56 कोटी 76 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही केला आहे. हा भ्रष्टाचार  300 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच अधिकाऱ्यांची बदली करतांना त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप धसांनी केला आहे. कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यासाठी धनंजय मुंडेंनी रेटकार्ड तयार केलं होतं. ते रेटकार्डचं सुरेश धसांनी माध्यमांना दाखवत धनंजय मुंडेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.