शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, कल्याणमधून वैशाली दरेकरांना उमेदवारी

UBT Second List:  कल्याणमधून वैशाली दरेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

Updated: Apr 3, 2024, 01:51 PM IST
शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, कल्याणमधून वैशाली दरेकरांना उमेदवारी  title=
UBTLoksbha Candidate Second list

Loksabha Election 2024: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. कल्याणमधून वैशाली दरेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हातकणंगलेमधून सत्यजित पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी एकूण 4 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. काही दिवसांपुर्वी ठाकरे गटाकडून 17 जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये अनंत गिते, अनिल देसाई, अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत, राजन विचारे, अमोल किर्तीकर या नावांचा समावेश होता. 

4 उमेदवार जाहीर

 कल्याणमधून वैशाली दरेकर, हातकणंगले सत्यजित पाटील, पालघरमधून भारती कामडी तर जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर हा सामना पाहायला मिळणार आहे. 

उन्मेश पाटलांना कळला गद्दारी आणि निष्ठेतील फरक

जळगाव भाजपचे आमदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. देशात सगळीकडे एकतर्फी वातावरण आहे. देश हुकूमशाहीच्या दिशेने चालला आहे. पुन्हा एका व्यक्तीचे आणि पक्षाचे सरकार आले तर देश हुकुमशाहीकडे जाईल. ज्यांनी पक्षात मेहनत केली त्यांना फेकून देण्याचे भाजपने अवलंबले आहे. गद्दारी आणि निष्ठेतील फरक उन्मेश यांनी दाखवला आहे. शिवसेना-भाजपमध्ये ही जागा भाजपकडे होती. तेथे उन्मेश हेच उमेदवार होते. दरम्यान जळगावमधून उन्मेश पाटलांना उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवली होती. पण ठाकरे गटाकडून जळगावमधून करण पवार यांना संधी देण्यात आली आहे.

'अमरावतीत कोणाची लाट नाही...नेते लाचार झालेयत....', बच्चू कडूंनी भाजप, राणांविरोधात थोपाटले दंड 

लोकसभेसाठी ठाकरे गट उमेदवारांची यादी 

बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख
मावळ - संजोग वाघेरे-पाटील
सांगली -चंद्रहार पाटील
हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर
छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे
धाराशिव - ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
नाशिक - राजाभाई वाजे
रायगड - अनंत गीते
सिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊत
ठाणे - राजन विचारे
मुंबई-ईशान्य - संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण - अरविंद सावंत
मुंबई-वायव्य - अमोल कीर्तिकर
परभणी - संजय जाधव
मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई 
कल्याण लोकसभा - वैशाली दरेकर 
हातकणंगले - सत्यजीत पाटील
पालघर - भारती कामडी
जळगाव - करण पवार

किरण सामंत यांची सिंधुदुर्ग मतदार संघातून माघार? फेसबुक पोस्टमुळे एकच खळबळ

शिंदेना त्रास नको म्हणून किरण सामंत भावनिक पण जागा शिवसेनेलाच-उदय सामंत